वर्ग ३ कविता ४. वारांचे गाणे :- प्रश्न उत्तरे
वर्ग ३ कविता ४. वारांचे गाणे - प्रश्न उत्तरे
शब्दार्थ
वार :- दिवस, दिन, वासर
गाणे :- गीत
गप्पा :- बोलणे
गोष्टी :- कथा
आवड:- पसंत
कृती:- क्रिया
परिसर :- सभोतालचे वातावरण
शिकणे :- अध्ययन
निरीक्षण:- एकटक पाहणे
माती:- मृदा
दंग :- मग्न
भाषण :- बोलणे
बाल सभा :- लहान मुलांचा एकत्र आलेला गट ,ज्यात सर्व मुले बोलण्यासाठी तयार असतात./ लहान मुलांचा समूह
पान :- पर्ण
फुल :- पुष्प
झाड :- वृक्ष
सफर :- फिरणे
प्रश्न १. सात वारांची नावे लिहा.
सोमवार, मंगळवार, बुधवार,गुरुवार,शुक्रवार,शनिवार,रविवार.
प्रश्न २. वारांचे गाणे ही कविता सुंदर अक्षरात लिहा.
:- सुंदरक्षरात कविता लिहा.
प्रश्न ३. पंचाक्षरी/पाचक्षरी वार कोणता?
:~ पंचाक्षरी वार मंगळवार आहे.
प्रश्न ४. सोमवार नंतर दोन दिवसांनी येणारा वार कोणता?
:-सोमवार नंतर दोन दिवसांनी येणारा वार बुधवार आहे.
प्रश्न ५. गाणी गप्पा गोष्टींचा वार कोणता?
:- गाणी गप्पा गोष्टींचा वार सोमवार आहे.
प्रश्न ६. निरीक्षणाचा वार कोणता?
:- निरीक्षणाचा वार मंगळवार आहे.
प्रश्न ७. बालसभा कोणत्या दिवशी जमली?
:- बालसभा गुरुवार या दिवशी जमली.
प्रश्न ८. कवायत कोणत्या दिवशी केली जाते?
:- कवायत शनिवारी केली जाते.
प्रश्न ९.मुले सहलीला कोणत्या दिवशी जातात?
:- मुले सहलीला शुक्रवारी जातात.
प्रश्न १०. वारांचे गाणे या कवितेतून आपण काय शिकलो?
:- वारांचे गाणे या कवितेतून आपण शालेय जीवनातील प्रत्येक दिवसाचे नियोजन कसं केले जाते हे शिकलो.
तसेच विद्यार्थांनी प्रत्येक दिवसाला काय आणि कसं शिकायचे आहे. ह्या विषयी उदाहरणांसह माहिती विषयक विचार हया कवितेतून शिकलो.
Comments
Post a Comment