वर्ग ३. कविता १. झोका ( प्रश्न उत्तरे -गृहपाठ )
सदर कार्य मराठीच्या वहीत लिहा.
वर्ग ३. कविता १. झोका
प्रश्न १. एका वाक्यात उत्तरे लिहा.
अ. दोर कशाचा आहे?
उत्तर:- दोर सुताचा आहे.
आ. दोर कुठे टांगला आहे?
उत्तर:- झाडावर सुताचा दोर टांगला आहे.
इ. झोक्यावर कोण बसले आहे ?
उत्तर:- झोक्यावर बाळू बसला आहे.
प्रश्न २. कोण ते ओळखा.
अ. झोक्यावर बसणारा- बाळू
आ. झोका देणारी - ताई
इ. दुरून बघणारे कोण?:- बाबाआई
ई. अंगावर पडणारे- फुले
व्याकरण
प्रश्न ३. समानार्थी शब्द लिहा.
अ. झाड - वृक्ष
आ. भाऊ - बंधू
इ. फुल - पुष्प
ई. बहीण /ताई - भगिनी
उ. आभाळ - आकाश
ऊ. चांदोबा - चंद्र,शशी
प्रश्न ४. विरुद्धार्थी शब्द लिहा.
अ. आई X वडील
आ. मागे X पुढे
इ . मुलगा X मुलगी
ई . चंद्र X सूर्य
उ. जमीन X आकाश
प्रश्न ५. वचन बदला.
एक वचन अनेक वचन
अ. झाड - झाडे
आ. मुलगी - मुली
इ. मुलगा - मुले
ई. दोर - दोर
Comments
Post a Comment