नमस्कार मंडळी आपल्या आवडत्या ब्लॉकवर आपले स्वागत आहे . मंडळी मागील काव्य लेखनास आपण वाचन प्रेमी मंडळींनी खूप प्रतिसाद दिला. आज आपल्यासाठी नाविन्यपूर्ण अशी वास्तवदर्शी व दिनविशेष पर आधारित काव्य रचना या ब्लॉकवर घेऊन आलो आहे. एकदा नक्की वाचा. व प्रतिक्रिया द्या. 'सर्व मातांसाठी शुभेच्छा संदेश' कविता - 'आई' (मातृ गौरव दिन) प्रेम मूर्ती ,त्यागमूर्ती कष्ट मुर्ती तू आई । सप्तनभीच्या तारकांचें तेज तू आई ।। हिम गिरीच्या शितलतेची छाया तू आई। आभाळतील काळ्या नगातील जल धारा तू आई । खड्ग सम धारदार ,कणखर तू आई। संकटसमयी ढाल होऊनी, धैर्य दावी तू आई। माझी ममता, सदाची समता, तू आई। अंगी नम्रता, हृदयी वात्सल्यता, वाणी मधुरता तू आई। करुणा सागर, संस्कार नागंर, तू आई। प्रेमाचा पाझर, कर्तव्याचा जागर, तू आई। झुळझुळ खळखळ शीतल पाणी, गोड गोड अमृत वाणी, तू आई। कर्तव्याचा व्हावे मी धनी, नित्य असे हे तुझ्या मनी, हे स्वप्न साकार करण्य...