शिरपूर तालुका खान्देश साहित्य संघाचे कवी संमेलन उत्साहात संपन्न ..
शिरपूर तालुका खान्देश साहित्य संघाचे कवी संमेलन उत्साहात संपन्न ..
शिरपूर :- दि.२७ जुलै रोजी खान्देश साहित्य संघ शिरपूर द्वारा आयोजित कवी संमेलन उत्साहात संपन्न झाले.
खान्देश साहित्य संघ द्वारा मासिक काव्य संमेलन आयोजित केले जाते. प्रत्येक संमेलनात विषय ठरवून तालुक्यातील निमंत्रित जेष्ठ साहित्यीक कवी यांना आमंत्रित केले जाते व त्यांच्या अनुभव व भाव विश्वातून साकार झालेल्या नव्या काव्य ज्योतींचा प्रकाश सर्व समान्य वाच, श्रोत्यांपर्यंत ध्वनीफीत, चित्रफीत द्वारे काव्य संकलन करून पोहचविले जाते.
या उपक्रमात श्रोते प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या आपला सहभाग नोंदवतात.
या काव्य मैफिलचे आयोजन प्रेमकमल वसाहतीतील प्रा.डॉ.नागोराव डोंगरे यांच्या निवासस्थानी करण्यात आले होते. कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थान सौ शिल्पाताई प्रसन्न जैन यांनी भूषविले तर कवी संमेलनाचे प्रास्ताविक शिरपूर तालुका खान्देश साहित्य संघाचे अध्यक्ष मा. श्री के.बी. लोहार यांनी केले.
कवी संमेलनात उपस्थित कवींनी आपल्या स्वरचित पाऊस विषयावरील कवितांचे गायन केले. एकापेक्षा एक दर्जेदार कवितांचे सादरीकरण झाल्याने त्या कवितांमध्ये चिंब भिजण्याचा सुखद अनुभव रसिक श्रोत्यांनी घेतला आणि प्रचंड टाळ्यांचा प्रतिसाद दिला.
कवी संमेलनाच्या अध्यक्षा सौ. शिल्पाताई प्रसन्न जैन यांनी आपल्या कवितेचे सादरीकरण करून उपस्थित सर्व कवींच्या पाऊस विषयावरील कवितांचे थोडक्यात विवेचन केले व उपस्थित सर्व साहित्य बंधु भगिनींचे आभार मानले.
कवी संमेलनासाठी सर्व सन्माननीय... श्री सुभाष नाना अहिरे, श्री एम के भामरे बापू, प्रा.डॉ.रजनीताई लुंगसे, प्रा.निशांत गुरु सर, श्री बी.व्ही.श्रीराम सर, श्री के.बी.लोहार, प्रा. डॉ. नागोराव डोंगरे, श्री आनंद देशमुख सर, डॉक्टर श्री मनोजभाऊ निकम, श्री एन. एच. महाजन सर, सौ मंगलाताई दोरीक, श्री सिकंदरभाई शेख, सौ. सुरेखाताई डोंगरे, श्री रविंद्र खोंडे सर,श्री सुभाष बडगुजर, प्रा श्री पठाण सर, डॉ.श्री बी.सी.थुल, श्री प्रबुद्ध शिरसाठ, श्री गुरव सर आदि उपस्थित होते.
या कवी संमेलनाचे सूत्रसंचालन श्री बी.व्ही श्रीराम सर यांनी केले. आभार प्रा.श्री. नागोराव डोंगरे यांनी मानले.
Comments
Post a Comment