वर्ग ८ वी कविता क्र. ३ - प्रभात स्वाध्याय
कविता क्र. ३ - प्रभात
शब्दार्थ ( Meanings )प्रभात - सकाळ
तेज - प्रकाश
नभ - आकाश
प्रतिभा - नवनिर्मितीची शक्ती
पटांगण - मोठे अंगण
मनोहर - सुंदर
आपुलकी - आत्मीयता, स्नेह, प्रेम
सुवास - सुगंध
निरंतर - सतत, नेहमी
अमूल्य अनमोल
शिकवण - उपदेश, शिक्षण
पायाभरणी - मुळातील भक्कमपणा
अस्तित्व - स्वत्व
तन सुदृढ - आरोग्यदायी , निरोगी
रुजवणूक - रुजलेले, रोवणे
तत्त्व - सिद्धांत
प्रश्न १ एक वाक्यता उत्तरे लिहा.
अ)
उत्तर - कवीने वर्णिलेली प्रतिभेची प्रभात कलागुणांच्या क्षितिजावरती होणार आहे .
आ)
उत्तर - कवीच्या मते व्यक्तित्वाच्या प्रयोगशाळेत शरीर सुदृढ , मन विशाल , तत्त्वांची रुजवणूक व अस्तित्वाची पायाभरणी होते .
इ)
उत्तर - नवीन स्वप्ने व नवीन आशा ही प्रगतीची नवपरिभाषा आहे .
प्रश्न २. गोलातील शब्दांचा आधार घेऊन चौकट पूर्ण करा.
१) सुंदर जग कोणाचे - फुला - पाखरांचे
२) पसरणारा सुवास कशाचा - आपुलकीचा
३) अमूल्य शिक्षण कोणाची - गुरुजनांची
४) पायाभरणी कशाची - अस्तित्वाची
प्रश्न ३. यमक जुडणारे शब्द लिहा.
१.नभात -प्रभात - युगात
२. मनोहर - सुंदर - निरंतर
३. अस्तित्वाची - व्यक्तित्वाची - तत्त्वांची
४. युगात - प्रभात - रगारगांत .
प्रश्न ४. तुमच्या शब्दात उत्तरे लिहा.
( १ ) ' तनसुदृढ ' आणि ' मन विशाल ' या शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा .
उत्तर : जिये व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होते , अशा प्रयोगशाळेत रुजू झाल्यावर व्यक्तित्वात काय बदल होतात हे सांगताना कवी म्हणतात - शरीर हे निरोगी होते , आरोग्यदायी व मुदद होते . शरीराला आजार स्पर्श करीत नाहीत . मनातील सर्व जळमटे दूर होऊन मन स्वच्छ होते . मनात मानवतेचा रहिवास होतो . आणि ते विशाल होते . मन सात्विक होते . मनात कोणाबद्दलही भेदभाव राहत नाहीत , सर्व दुर्गुणांचा निचरा होतो .
( २ ) तुम्हांला कळलेली कवीची प्रगतीची नवपरिभाषा स्पष्ट करा .
उत्तर - या नवीन युगाच्या आकाशात ज्ञानाचे तेज पसरल्यावर व नवनिर्मितीची प्रभात झाल्यावर देशाच्या उज्ज्वल भवितव्याची खूण पटेल हे समजावून सांगताना कवी म्हणतात की नवीन स्वने उराशी बाळगणे , नवीन आशेने फुलणे आवश्यक आहे . आपल्या अपार कष्टाने व सततच्या अभ्यासाने आपला देश उन्नत होईल . भेदाभेद नसलेल्या या मानवतेच्या युगात देश प्रगतिपथावर जाईल . हीच प्रगतीची नवीन व्याख्या आहे . ही भरभराटीची व उत्कर्षाची नवीन परिभाषा आहे .
( ३ ) ' मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात ' या ओळींचा तुम्हांला कळलेला सरळ अर्थ लिहा .
उत्तर : नवीन स्वप्ने उराशी बाळगून , नवीन आशेने पल्लवित होऊन प्रगतीची नवीन व्याख्या करूया असा तरुणपिढीला सल्ला देताना कवी म्हणतात आपल्या मेहनतीने व गाढ अभ्यासाने आपल्या देशाला उन्नत बनवायचे असेल तर आपल्यातील हेवेदावे , भेदाभेद हे सर्व मिटवून टाकायला हवेत ; तरच माणुसकीचे युग अवतरेल . मानवतेचे युग निर्माण करूया ; त्यासाठी परस्परांतील विषमतेचे विष धुडकावून लावूया . सर्व समान आहेत हा विश्वास रुजवूया .
Comments
Post a Comment