मराठी भाषा परिचय -

 घटक- अक्षर ,शब्द वाक्य या वरून परिच्छेद/उतारा
मुळाक्षरे / अक्षर- भाषेत वापरल्या जाणाऱ्या भाषीक चिन्हांना मुळाक्षरे/अक्षर असे म्हणतात.
मराठी भाषेतील अक्षरे व त्यांचे प्रकार खालील प्रमाणे......
मराठी मुळाक्षरे
स्वर:-अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं अ:=१२ स्वर (अ+ ऑ - २) =
मराठीत एकूण १४ स्वर आहेत.
व्यंजन:-
क,ख,ग,घ, ङ
च, छ ज झ त्र
ट ठ ड ढ ण
त थ द ध न
प फ ब भ म
य र व श ष
स ह ळ
क्ष ज्ञ
= ३५ + १ =३६ (त+र=त्र)

मराठीत एकूण व्यंजन - ३६.
३६+१४= ५०+२=५२
(ऋ, + लृ = स्वर संस्कृत)

अक्षरे म्हणजे काय?
अक्षरे म्हणजे 'भाषिक चिन्हे' होय.
उदा. क,ग,म,च,घ,र
इत्यादी. अक्षरे होत.


शब्द म्हणजे काय ?
शब्द म्हणजे अक्षरांचा समूह होय.
अक्षरांच्या समूहाला योग्य अर्थ प्राप्त झाल्यावर त्याला अर्थयुक्त शब्द असे म्हणतात.
उदा. क, म, ळ -अक्षरे
कमळ= अर्थ युक्त शब्द
ळमक = हा अर्थहीन शब्द आहे.
(ज्याला कोणताही अर्थ नाही असा)
वाक्य :- अर्थ युक्त शब्दांचा समूहाला वाक्य असे म्हणतात.
(उदा. राम, झाडावरील, पिकलेला, आंबा, खातो, तोडून.)
अर्थयुक्त वाक्य :-
राम झाडावरील पिकलेला आंबा तोडून खातो.

उतारा/परिच्छेद म्हणजे काय?
उतार म्हणजे अर्थयुक्त वाक्यांचा समूह होय. अर्थ युक्त वाक्यांचा समुहाला परिच्छेद किंवा उतारा असे म्हणतात.
उदा. पुढील प्रमाणे...
शब्द :-
गाय,पाळीव ,प्राणी, दूध ,देते,
गाईला चार पाय ,दोन शिंगे,
एक शेपूट , गाईचे दूध ,गोड,
आई , आईचे दूध, समान,
गाईला पुजले , जाणे,
गाईचे शेणापासून, गौऱ्या ,
गोमूत्र,पवित्र. शेतकरी ,
शेतीला ,जोड व्यवसाय म्हणून,
पशु पालन व्यवसाय करणे.
प्रश्न वरील शब्दांवरून एक परिच्छेद/उतारा तयार करा.
माहिती/परिच्छेद
उतारा/निबंध लेखन
उदाहरण :-

विषय :- गाय
गाय ही एक पाळीव प्राणी आहे.
गाय आपणास दूध देते.गाईला चार पाय असतात. गाईला एक शेपूट असते. गाईला आई समान मानतात,
कारण आईच्या दुधावर बाळाची वाढ होते , तशी गाईच्या दुधावर देखील होते.
म्हणून गाईला माता म्हटले जाते.
लहान मुलांना गाईचे दूध पाजले जाते. गाईच्या शेणापासून गौऱ्या तयार केल्या जातात. तसेच गाईचे मूत्र त्यास 'गोमूत्र'असे म्हणतात.त्याचा वापर पवित्र व प्रसन्न वातावरण निर्मिती व्हावी यासाठी केला जातो; म्हणून आपण सर्वजण गाईला देवस्वरूप मानतात. शेतकरी हा शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपाल हा व्यवसाय करतात.

Comments

Popular posts from this blog

वर्ग ३ ,४ व ५ साठी माहिती लेखन उतारे (सराव कार्य)

वर्ग ३ कविता १. झोका , २. सिंह आणि कोल्हा व पाठ ३. आपण सारे खेळू गृहपाठ/स्वाध्याय  ( प्रश्न उत्तरे -गृहपाठ )

वर्ग ३. कविता १. झोका ( प्रश्न उत्तरे -गृहपाठ )