Posts

Showing posts from July, 2022

सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?- लोकमान्य टिळक यांची विशेष माहिती

*सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?* _“मनुष्य स्वभावतः कितीही चांगला असला तरी शिक्षणाने त्याच्या बुद्धीचा विकास झाल्याशिवाय देशाची उन्नती होत नाही...”_ ---- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक         स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार या चतु:सूत्रीच्या जोरावर टिळकांनी राष्ट्रभक्तीची लाट निर्माण केली. त्यांनी राष्ट्रीय शिक्षणाचा विचार सांगून तो कृतीत आणला.         विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि टिळकांनी 1 जानेवारी 1880  रोजी 'न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. त्यांनी विनावेतन शिक्षकी पेशा पत्करला. 1884 मध्ये त्यांनी आगरकरांसोबत 'डेक्कन एज्युकेशन सोसायटी'ची स्थापना केली. याच संस्थेमार्फत 1885 ला फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली. यात ते गणित आणि संस्कृत विषय शिकवित.        जनतेला स्वातंत्र्य चळवळीसाठी उद्युक्त करून सामाजिक परिवर्तन घडविण्यासाठी 1881 साली मराठी भाषेतून 'केसरी' आणि इंग्रजीतून 'मराठा' हे वृत्तपत्रे सुरु केली. 1882 साली भारतातील सर्वाधिक खप असलेले 'केसरी' हे वर्तमानपत्र होते. त्यातील टिळकांचे 'अग्रलेख' हा केसरीचा आत्मा होता. 1881 ते 192

वर्ग ३ कविता ४. वारांचे गाणे :- प्रश्न उत्तरे

वर्ग ३ कविता ४. वारांचे गाणे - प्रश्न उत्तरे शब्दार्थ वार :- दिवस, दिन, वासर गाणे :- गीत गप्पा :- बोलणे  गोष्टी :- कथा आवड:- पसंत कृती:- क्रिया परिसर :- सभोतालचे वातावरण शिकणे :- अध्ययन निरीक्षण:- एकटक पाहणे माती:- मृदा दंग :- मग्न भाषण :- बोलणे बाल सभा :- लहान मुलांचा एकत्र आलेला गट ,ज्यात सर्व मुले बोलण्यासाठी तयार असतात./ लहान मुलांचा समूह पान :- पर्ण फुल :-  पुष्प झाड :- वृक्ष सफर :- फिरणे प्रश्न १. सात वारांची नावे लिहा. सोमवार, मंगळवार, बुधवार,गुरुवार,शुक्रवार,शनिवार,रविवार. प्रश्न २. वारांचे गाणे ही कविता सुंदर अक्षरात लिहा. :- सुंदरक्षरात कविता लिहा. प्रश्न ३. पंचाक्षरी/पाचक्षरी वार कोणता? :~  पंचाक्षरी वार मंगळवार आहे. प्रश्न ४. सोमवार नंतर दोन दिवसांनी येणारा वार कोणता? :-सोमवार नंतर दोन दिवसांनी येणारा वार बुधवार आहे. प्रश्न ५. गाणी गप्पा गोष्टींचा वार कोणता? :- गाणी गप्पा गोष्टींचा वार सोमवार आहे. प्रश्न ६. निरीक्षणाचा वार कोणता? :- निरीक्षणाचा वार मंगळवार आहे. प्रश्न ७. बालसभा कोणत्या दिवशी जमली? :- बालसभा गुरुवार या दिवशी जमली. प्रश्न ८. कवायत कोणत्या दिवशी केली जाते? :-

शिरपूर तालुका खान्देश साहित्य संघाचे कवी संमेलन उत्साहात संपन्न ..

Image
शिरपूर तालुका खान्देश साहित्य संघाचे कवी संमेलन उत्साहात संपन्न .. शिरपूर :- दि.२७ जुलै रोजी खान्देश साहित्य संघ शिरपूर द्वारा आयोजित कवी संमेलन उत्साहात संपन्न झाले.    खान्देश साहित्य संघ द्वारा  मासिक काव्य संमेलन आयोजित केले जाते. प्रत्येक संमेलनात विषय ठरवून तालुक्यातील निमंत्रित  जेष्ठ साहित्यीक कवी यांना आमंत्रित केले जाते व त्यांच्या  अनुभव व भाव विश्वातून साकार झालेल्या नव्या काव्य ज्योतींचा प्रकाश सर्व समान्य वाच, श्रोत्यांपर्यंत ध्वनीफीत, चित्रफीत द्वारे काव्य संकलन करून पोहचविले जाते.  या उपक्रमात श्रोते प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या आपला सहभाग नोंदवतात.    या काव्य मैफिलचे आयोजन प्रेमकमल वसाहतीतील प्रा.डॉ.नागोराव डोंगरे यांच्या निवासस्थानी करण्यात आले होते. कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थान सौ शिल्पाताई प्रसन्न जैन यांनी भूषविले तर कवी संमेलनाचे प्रास्ताविक शिरपूर तालुका खान्देश साहित्य संघाचे अध्यक्ष मा. श्री  के.बी. लोहार यांनी केले.      कवी संमेलनात उपस्थित कवींनी आपल्या स्वरचित पाऊस विषयावरील कवितांचे गायन केले.  एकापेक्षा एक दर्जेदार कवितांचे सादरीकरण झाल्याने त्या कवितांमध

🪔 कशी साजरी करावी दीप अमावस्या🪔

🪔 कशी साजरी करावी दीप अमावस्या🪔 *आषाढ अमावस्या म्हणजेच "दिव्यांची अमावस्या".* *काय करावे....* *🪔 घरातील दिव्यांना दूध पाण्याने धुऊन स्वच्छ करावेत.* *🪔 पाटावर वस्त्र घालून त्यावर दिवे ठेवावेत. त्यांची पूजा करावी.* *🪔 आज पासूनच पत्रीचे महत्त्व सुरू होते.* *🪔 आघाडा, दूर्वा, पिवळी फुले यांनी दिव्यांची पुजा करावी.* *🪔 गोडाचा नैवेद्य अर्पण करावा.* *🪔 आपल्या घरातील लहान मुलाचे औक्षण करावे.* *🪔 दूर्वा ही वंश वृद्धीचे प्रतीक आहे, त्यामुळे ते ही अर्पण करून प्रार्थना करावी.* *🪔 या दिवशी सुवासिनी स्त्रिया घरातले दिवे घासून-पुसून एकत्र मांडतात.* *🪔 त्याच्या भोवती रांगोळ्या घालतात व ते दिवे प्रज्वलित करून त्याची पूजा केली जाते.* *🪔 पूजेमध्ये पक्वान्नांचा महानैवैद्य दाखविला जातो. त्यावेळी पुढील मंत्राने दिव्याची प्रार्थना करतात.* *🪔 ती प्रार्थना अशी 🪔 * *‘‘दीप सूर्याग्निरुपस्त्वं तेजसां तेज उत्तमम्‌| गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव॥* *अर्थ:* _‘‘हे दीपा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस. तेजा मध्ये तू उत्तम तेज आहेस._ *माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.

वर्ग ३. पाठ ३ आपण सारे खेळू (गृहपाठ / HW)

Image

वर्ग ३. पाठ २. सिंह आणि कोल्हा (गृहपाठ प प्रश्न उत्तरे )

पाठ २. सिंह आणि कोल्हा गृहपाठ/स्वाध्याय  प्रश्न १.  एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. आजारी कोण होता? उत्तर :- आजारी सिंह होता. आ. शिकार शोधण्यासाठी कोण गेला? उत्तर :- शिकार शोधण्यासाठी कोल्हा गेला. इ. कोल्ह्याला कोणती शिकार दिसली? उत्तर :- कोल्ह्याला मेंढी ही  शिकार दिसली. ई. सिंहाला कोण भेटायला आला? उत्तर :- सिंहाला कोल्हा भेटायला आला.  प्रश्न २. कोण ते लिहा. अ. आजारी असणारा  :-   सिंह  आ. शिकार करणारा  :-  कोल्हा इ.  कोल्ह्याच्या मागे धावणारा :-  कुत्रा  ई.  कोल्ह्याला दिसणारी शिकार :-  मेंढी     व्याकरण   प्रश्न ३. समानार्थी शब्द लिहा. अ. जंगल = वन  आ. चांगली = योग्य  इ.   कुत्रा = स्वान  ई.  वेगाने  = जलद  उ.  धावणे  = पळणे  प्रश्न ४.  विरुद्धार्थी शब्द लिहा. अ. तिथे X  येथे  आ. चांगली X वाईट  इ.  रोगी  X निरोगी   ई.  वेगाने  X हळुवार  उ.  धावणे X थांबणे  ऊ.  एक  X  अनेक प्रश्न ५.  वचन बदला.  एक वचन      अनेक वचन  अ. कुत्रा    –    कुत्रे/ कुत्री   आ. मेंढी   –     मेंढ्या इ. सिंह    –     सिंह  प्रश्न ६. खालील चित्राबद्दल माहिती लिहा. (पाच वाक्य)

वर्ग ३. कविता १. झोका ( प्रश्न उत्तरे -गृहपाठ )

सदर कार्य मराठीच्या वहीत लिहा. वर्ग ३.   कविता १.  झोका प्रश्न १. एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. दोर कशाचा आहे? उत्तर:- दोर सुताचा आहे. आ.  दोर कुठे टांगला आहे? उत्तर:- झाडावर सुताचा दोर टांगला  आहे. इ.  झोक्यावर कोण बसले आहे ? उत्तर:- झोक्यावर बाळू बसला आहे. प्रश्न २. कोण ते ओळखा. अ. झोक्यावर बसणारा- बाळू आ.  झोका देणारी - ताई इ. दुरून बघणारे कोण?:- बाबाआई ई.  अंगावर पडणारे- फुले व्याकरण प्रश्न ३. समानार्थी शब्द लिहा. अ.  झाड - वृक्ष आ. भाऊ - बंधू इ. फुल - पुष्प ई.  बहीण /ताई - भगिनी उ. आभाळ - आकाश ऊ. चांदोबा -  चंद्र,शशी प्रश्न ४.  विरुद्धार्थी शब्द लिहा. अ.  आई X वडील आ.  मागे X पुढे इ .  मुलगा X मुलगी ई .  चंद्र X सूर्य उ. जमीन X आकाश प्रश्न ५. वचन बदला.  एक वचन     अनेक वचन अ.  झाड         -      झाडे आ.  मुलगी      -      मुली इ.    मुलगा       -      मुले ई.     दोर       -         दोर

वर्ग ५ वी पाठ ४ ही पिसे कोणाची? प्रश्न उत्तरे

Image
  पाठ ४ ही पिसे कोणाची? प्रश्न १. एक वाक्यात उत्तरे लिहा. (अ) मिनूचे घर कोठे होते? (आ) मिनू कोणाकोणाला भेटली? (इ) मिनूला बदकाचा पत्ता कोणी सांगितला? (ई) पिसे कोणाची होती? (उ) मिनूने बदकाला काय सांगितले? उत्तर: (अ) मिनूचे घर शेतात होते. (आ) मिनू कोंबडीताई, कबुतरदादा, मोर व शेवटी बदकाला भेटली. (इ) मिनूला बदकाचा पत्ता मोराने सांगितला. (ई) पिसे बदकाची होती. (उ) मिनूने बदकाला सांगितले की, “तुझी पिसं मला सापडली आहेत. मी तुला शोधत होते, ही घे तुझी पिसं.” प्रश्न २. रिकाम्या जागी जुळणाऱ्या योग्य पर्यायापुढे ‘✓’ अशी खुण करा. प्रश्न 1. पिसे सापडल्यावर मिनूला …………………………….. उत्तर: (अ) पिसे कोणाची आहेत हे माहीत करून घ्यायचे होते. [✓ ] (ब) पिसे घरी न्यायची होती. [ ] 3. जोड्या जुळवा. प्रश्न 1. जोड्या जुळवा. उत्तर: ‘अ’ गट ‘ब’ गट 1. बदक (अ) झाड 2. कोंबडी (आ) नदी 3. कबुतर (इ) खुराडे 4. उदाहरणे वाचा. त्याप्रमाणे लिहा. प्रश्न 1. खाली दिलेल्या उदाहरणाप्रमाणे शब्दांना प्रत्यय लावून शब्द तयार करा. उदाहरणे – घर – घरापासून, घर – घराजवळ, खुराडे – खुराड्यात गाव तळे पाय घरटे उत्तर: गावापासून तळ्यात पाय

वर्ग ३ कविता १. झोका , २. सिंह आणि कोल्हा व पाठ ३. आपण सारे खेळू गृहपाठ/स्वाध्याय  ( प्रश्न उत्तरे -गृहपाठ )

Image
कविता  १.  झोका  ( प्रश्न उत्तरे -गृहपाठ ) सदर कार्य मराठीच्या वहीत लिहा. वर्ग ३.   कविता १.  झोका प्रश्न १. एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. दोर कशाचा आहे? उत्तर:- दोर सुताचा आहे. आ.  दोर कुठे टांगला आहे? उत्तर:- झाडावर सुताचा दोर टांगला  आहे. इ.  झोक्यावर कोण बसले आहे ? उत्तर:- झोक्यावर बाळू बसला आहे. प्रश्न २. कोण ते ओळखा. अ. झोक्यावर बसणारा- बाळू आ.  झोका देणारी - ताई इ. दुरून बघणारे कोण?:- बाबाआई ई.  अंगावर पडणारे- फुले व्याकरण प्रश्न ३. समानार्थी शब्द लिहा. अ.  झाड - वृक्ष आ. भाऊ - बंधू इ. फुल - पुष्प ई.  बहीण /ताई - भगिनी उ. आभाळ - आकाश ऊ. चांदोबा -  चंद्र,शशी प्रश्न ४.  विरुद्धार्थी शब्द लिहा. अ.  आई X वडील आ.  मागे X पुढे इ .  मुलगा X मुलगी ई .  चंद्र X सूर्य उ. जमीन X आकाश प्रश्न ५. वचन बदला.  एक वचन     अनेक वचन अ.  झाड         -      झाडे आ.  मुलगी      -      मुली इ.    मुलगा       -      मुले ई.     दोर       -         दोर पाठ २. सिंह आणि कोल्हा गृहपाठ/स्वाध्याय  प्रश्न १.  एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. आजारी कोण होता? उत्तर :- आजारी सिंह होता. आ. शिकार शोधण्यासाठी कोण गेला? उत्

गद्दार मराठा नेते

गद्दार मराठा नेते मोदी,शहा व फडणवीस चे लाचार कुत्रे का झाले हा लेख सर्व मराठा बहुजनांनी समजून घ्यावे हीच विनंती.......                               महाराष्ट्रातील *मराठे* *ब्राह्मणाच्या पितृछायेत का गेली?* प्रा केशव पवार कोल्हापूर. *ज्यांनी शिवरायांना शूद्र म्हणून राज्यभिषेक नाकारला,  बहुजनाच्या रक्तातून उदयास आलेलेे स्वराज्य पुढे पेशवाईने कपटाने बळकावले* . म.फुलेंच्या सत्यशोधकी चळवळीतून व राष्ट्रीय कॉंग्रेसच्या स्वातंत्र्य लढ्यातून ब्राह्मणेतर चळवळ सुरू झाली, या  ब्राह्मणेतर  नेत्यांनी स्वातंत्र्यानंतर राजकीय सत्ता संपादन केली. *मोठ्या भावाप्रमाणे जबाबदारीने गावगाडा हाकणारा मराठा समाज दलित आणि इतर मागासवर्गीयांना सोबत घेऊन  आधुनिक महाराष्ट्र् घडवला*. महाराष्ट्राला फुले,शाहु, आंबेडकर हा पुरोगामी चेहरा दिला. पण एकविसाव्या शतकात पुन्हा एकदा पेशवाईने  भांडवलशाहीच्या हातात हात घालून  पेशवाई स्थापन केली आहे आणि  मराठा व दलित, बहुजनांना सत्तेतून बेदखल केलं आहे. छत्रपती संभाजी राजाच्या हत्येनंतर  पेशव्यांनी शाहूला नाकर्ता म्हणून बाजूला सारले व मराठयांचे स्वराज्य बळकावून  पेशवाई आणली. आज त्या

वर्ग ८ वी कविता क्र. ३ - प्रभात स्वाध्याय

Image
  कविता क्र. ३ - प्रभात शब्दार्थ ( Meanings ) प्रभात - सकाळ तेज - प्रकाश नभ - आकाश प्रतिभा - नवनिर्मितीची शक्ती पटांगण - मोठे अंगण मनोहर - सुंदर आपुलकी - आत्मीयता, स्नेह, प्रेम सुवास - सुगंध निरंतर - सतत, नेहमी अमूल्य अनमोल शिकवण - उपदेश, शिक्षण पायाभरणी - मुळातील भक्कमपणा अस्तित्व - स्वत्व तन सुदृढ - आरोग्यदायी , निरोगी रुजवणूक - रुजलेले, रोवणे तत्त्व - सिद्धांत प्रश्न १ एक वाक्यता उत्तरे लिहा. अ) उत्तर - कवीने वर्णिलेली प्रतिभेची प्रभात कलागुणांच्या क्षितिजावरती होणार आहे . आ) उत्तर - कवीच्या मते व्यक्तित्वाच्या प्रयोगशाळेत शरीर सुदृढ , मन विशाल , तत्त्वांची रुजवणूक व अस्तित्वाची पायाभरणी होते . इ) उत्तर - नवीन स्वप्ने व नवीन आशा ही प्रगतीची नवपरिभाषा आहे . प्रश्न २. गोलातील शब्दांचा आधार घेऊन चौकट पूर्ण करा. १) सुंदर जग कोणाचे - फुला - पाखरांचे २) पसरणारा सुवास कशाचा - आपुलकीचा ३) अमूल्य शिक्षण कोणाची - गुरुजनांची ४) पायाभरणी कशाची - अस्तित्वाची प्रश्न ३. यमक जुडणारे शब्द लिहा. १.नभात -प्रभात - युगात २. मनोहर - सुंदर - निरंतर ३. अस्तित्वाची - व्यक्तित्वाची - तत्त्वांची ४. युगात - प्