Posts

वर्ग ८ वी कविता क्र. ३ - प्रभात स्वाध्याय

Image
  कविता क्र. ३ - प्रभात शब्दार्थ ( Meanings ) प्रभात - सकाळ तेज - प्रकाश नभ - आकाश प्रतिभा - नवनिर्मितीची शक्ती पटांगण - मोठे अंगण मनोहर - सुंदर आपुलकी - आत्मीयता, स्नेह, प्रेम सुवास - सुगंध निरंतर - सतत, नेहमी अमूल्य अनमोल शिकवण - उपदेश, शिक्षण पायाभरणी - मुळातील भक्कमपणा अस्तित्व - स्वत्व तन सुदृढ - आरोग्यदायी , निरोगी रुजवणूक - रुजलेले, रोवणे तत्त्व - सिद्धांत प्रश्न १ एक वाक्यता उत्तरे लिहा. अ) उत्तर - कवीने वर्णिलेली प्रतिभेची प्रभात कलागुणांच्या क्षितिजावरती होणार आहे . आ) उत्तर - कवीच्या मते व्यक्तित्वाच्या प्रयोगशाळेत शरीर सुदृढ , मन विशाल , तत्त्वांची रुजवणूक व अस्तित्वाची पायाभरणी होते . इ) उत्तर - नवीन स्वप्ने व नवीन आशा ही प्रगतीची नवपरिभाषा आहे . प्रश्न २. गोलातील शब्दांचा आधार घेऊन चौकट पूर्ण करा. १) सुंदर जग कोणाचे - फुला - पाखरांचे २) पसरणारा सुवास कशाचा - आपुलकीचा ३) अमूल्य शिक्षण कोणाची - गुरुजनांची ४) पायाभरणी कशाची - अस्तित्वाची प्रश्न ३. यमक जुडणारे शब्द लिहा. १.नभात -प्रभात - युगात २. मनोहर - सुंदर - निरंतर ३. अस्तित्वाची - व्यक्तित्वाची - तत्त्वांची ४. युगात ...

मराठी भाषा परिचय -

Image
 घटक- अक्षर ,शब्द वाक्य या वरून परिच्छेद/उतारा मुळाक्षरे / अक्षर- भाषेत वापरल्या जाणाऱ्या भाषीक चिन्हांना मुळाक्षरे/अक्षर असे म्हणतात. मराठी भाषेतील अक्षरे व त्यांचे प्रकार खालील प्रमाणे...... मराठी मुळाक्षरे स्वर:-अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं अ:=१२ स्वर (अ+ ऑ - २) = मराठीत एकूण १४ स्वर आहेत. व्यंजन:- क,ख,ग,घ, ङ च, छ ज झ त्र ट ठ ड ढ ण त थ द ध न प फ ब भ म य र व श ष स ह ळ क्ष ज्ञ = ३५ + १ =३६ (त+र=त्र) मराठीत एकूण व्यंजन - ३६. ३६+१४= ५०+२=५२ (ऋ, + लृ = स्वर संस्कृत) अक्षरे म्हणजे काय? अक्षरे म्हणजे 'भाषिक चिन्हे' होय. उदा. क,ग,म,च,घ,र इत्यादी. अक्षरे होत. शब्द म्हणजे काय ? शब्द म्हणजे अक्षरांचा समूह होय. अक्षरांच्या समूहाला योग्य अर्थ प्राप्त झाल्यावर त्याला अर्थयुक्त शब्द असे म्हणतात. उदा. क, म, ळ -अक्षरे कमळ= अर्थ युक्त शब्द ळमक = हा अर्थहीन शब्द आहे. (ज्याला कोणताही अर्थ नाही असा) वाक्य :- अर्थ युक्त शब्दांचा समूहाला वाक्य असे म्हणतात. (उदा. राम, झाडावरील, पिकलेला, आंबा, खातो, तोडून.) अर्थयुक्त वाक्य :- राम झाडावरील पिकलेला आंबा तोडून खातो. उतारा/परिच्छेद म्हणजे काय? उतार म्हणजे अर्...

घर

Image
..घर... कधी कधी मोकळ्या जागेवर चार एक विटा रचल्या जातात. सिमेंट वाळूच मिश्रण त्यावर लेपलं जातं. रंगांची उधळण केली जाते तरी त्याचे फक्त एका वास्तूत रूपांतर करण्यासाठी हा खटाटोप असतो. पण या वास्तूचे घरामध्ये रूपांतर होण्यास मात्र खूप कालावधी लागतो. त्या वास्तूला मायेच्या ओलाव्याचा गिलावा द्यावा लागतो. त्यावर संस्काराची लांबी रुंदी भरावी लागते. नंतर त्यासर्वांवर आपुलकी, प्रेम, जिव्हाळा यांचा रंगरुपी लेप लावावा लागतो. एवढं करून सुद्धा भागत नाही. नात्यांमधल्या ओढीचं Interior Decoration करावं लागतं. सुसंवादाची हवा खेळती राहावी म्हणून समंजसपणा आणि समजुतदारपणाचे पंखे असावे लागतात. सत्याचा मार्ग स्वच्छ दिसण्यासाठी सद्वर्तन, सदाचार, सदसद्विवेकबुद्धी, सुविचार यांसारख्या दिव्यांची प्रकाशयोजना करावी लागते. भूतकाळातील चांगल्या आठवणींची स्मृतिचिन्हे अभिमानाने भिंतीवर लावावी लागतात. त्याचप्रमाणे वाईट आठवणींची अडगळ सुद्धा माळ्यावर टाकून द्यावी लागते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवाच्या उपासनेचं छप्पर तयार करावं लागतं व 'विश्वास' नावाच्या वज्ररुपी अभेद्य फरशीने पाया रचावा लागतो.   ...

पंढरीचे वारकरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज*

Image
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *पंढरीचे वारकरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज*   🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸                      महाराष्ट्रात वारकरी सांप्रदाय हा अनादी कालापासून चालत आलेला सांप्रदाय आहे.या वारकरी सांप्रदायातच संत ज्ञानेश्वर महाराजांपासून संत तुकाराम महाराजांपर्यंत पुष्कळसे संत होऊन गेले. आणि त्याच वारकरी परंपरेतील विदर्भातील एक महान संत म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे सुद्धा पंढरीचे वारकरी व वारकरी संतच होते. महापुरुष दुर्लभ असतो व आपण सामान्यपणे त्यांना ओळखू शकत नाही.खरा सत्पुरुष आत्मप्रौढी पासून दूर असतो आणि प्रसिद्धी परान्मुख असतो.आपले तप,ज्ञान,अध्यात्मानुभव यांचा वाजागाजा करीत नाहीत.म्हणूनच त्यांचे विचार सामान्यांना एकदम समजत नाहीत.म्हणूनच राष्ट्रसंत वारकरी संत असूनही ते सामान्य जनांना समजलेच नाहीत.वारकऱ्यांची मुख्य लक्षणे कोणती याचा प्रथम विचार करू. *वारकऱ्यांची मुख्य लक्षणे* :- १)वारकऱ्यांचे दैवत श्री विठ्ठल. २)पंढरपूरची नित्यनेम वारी. ३)तुळशीची माळ गळ्यात घालणे व गोपीचंदन लावणे. ४)एकादशी...

पावसावरील कविता

Image
*पावसाकडे प्रत्येक कवी कसा वेगवेगळ्या सुंदर नजरेने पाहतो* *आणि कविता प्रत्येक पिढीनुसार* *कशी तरुण होते पहा……* ( अर्थात तुलना करणे  असा हेतू अजिबात नाहीये.. ) नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी : घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली; नको नाचू तडातडा असा कौलारावरून : तांबे-सतेली-पातेली आणू भांडी मी कोठून?                    *इंदिरा संत*  कालचा पाऊस आमच्या  गावात आलाच नाही, आम्ही आसवांनी शेते भिजवली..                              *यशवंत मनोहर* ए आई मला पावसात  जाऊ दे । एकदाच ग भिजुनी  मला चिंब चिंब होऊ दे ।। मेघ कसे बघ  गडगड करिती । विजा नभांतुन  मला खुणविती । त्यांच्यासंगे अंगणात मज  खूप खूप नाचु दे ।।                      *वंदना विटणकर*   नभं उतरू आलं,  चिंब थरथर वलं । अंग झिम्माड झालं,  हिरव्या बहरात ।। अशा वलंस राती,  गळा शपथा येती । स...

लेकीसाठी वैकुंठातुन

Image
*लेकीसाठी वैकुंठातुन*👨‍👧                   -----------------------------------          भल्या पहाटे उठून काकडा भजनाने तुकाराम महाराजांच्या दिवसाची सुरुवात व्हायची. नित्याप्रमाणे पांडुरंगाचं नामजप करत स्नान करून विठ्ठलाची पुजा झाली.तुळसीला वंदन करून महाराज घराबाहेर पडत असताना जिजाबाईने जोरानं हाक दिली.      काही काळजी आहे का संसाराची?पोरींची?तुम्हाला फक्त विठ्ठल विठ्ठल करायला पाहिजे. महाराज शांतपणे म्हणाले,आवले योग्य वेळ आल्यावर सर्व काही व्यवस्थित होत.योग्य वेळ येवू द्यावी लागते.परंतु जिजाबाईची नेहमीची कटकट ऐकून महाराज एकदिवशी जवळच यलवडी नावाचं गाव होतं. तिथे मुलगा पाहण्यासाठी गेले.तुकाराम महाराज आपल्या घरी आलेले पाहुन त्यांना खुप आनंद झाला. आणि महाराजांची मुलगी भागिरथी आपल्या घरी द्यायची हे जेव्हा त्यांनी ऐकलं तेव्हा आपल जिवन परिपूर्ण झालं, संतकुळातली मुलगी आपल्या घरात येणार म्हटल्यावर त्यांना अत्त्यानंद झाला.       अखेर लग्न झालं.भागिरथी महाराजांच्या गळ्यात पडून ...

वि दा सावरकर

Image
वि दा सावरकर  *ने मजसी ने परत मातृभूमीला*  *सागरा प्राण तळमळला.* *सागरा..........*..   भारत माते वर प्राणाहुन अधीक प्रेम करणारे वि दा सावरकर....  ब्रायटन येथे अभिनव भारत या संस्थेवर जेव्हा  इंग्रजांनी वक्र दृष्टी टाकली  त्यामुळे आपणास आता  परत मातृभूमीला येता येणार नाही हे जेव्हा समजले तेव्हा सावरकरांना  काव्य स्फुरले  आणि त्यांचा प्राण तळमळला...  *नभी  नक्षत्रे बहुत परी एक प्यारा*  *मज भारत भूमिचा तारा*  *प्रासाद इथे भव्य परी* *मज भारी आईची झोपडी प्यारी*  अशा शब्दातून त्यांना *सागरास* काव्य स्फुरले.  28 मे 1833 रोजी नाशिक जिल्ह्यातील भगूर ह्या गावी या क्रांतीचा लखलखता तारा उदयास आला. वेदशास्त्रसंपन्न घराण्यात जन्म.  त्यामुळे आहार-विहार,  आरोग्य संपदा त्यावर आपोआपच प्रेम जडलेले सावरकर लहानपणापासूनच खूप हुशार. वयाच्या 13-14 व्या   वर्षापासूनच ते काव्यही करू लागले. जीवनाच्या प्रत्येक अवस्थेत बाल्यावस्था. तारुण्यावस्था, वार्धक्य यात सावरकर एक  झुंजार वीर पुरुष म्हणूनच राहिले...