वि दा सावरकर
*ने मजसी ने परत मातृभूमीला*
*सागरा प्राण तळमळला.*
*सागरा..........*..
भारत माते वर प्राणाहुन अधीक प्रेम करणारे वि दा सावरकर....
ब्रायटन येथे अभिनव भारत या संस्थेवर जेव्हा इंग्रजांनी वक्र दृष्टी टाकली त्यामुळे आपणास आता परत मातृभूमीला येता येणार नाही हे जेव्हा समजले तेव्हा सावरकरांना काव्य स्फुरले
आणि त्यांचा प्राण तळमळला...
*नभी नक्षत्रे बहुत परी एक प्यारा*
*मज भारत भूमिचा तारा*
*प्रासाद इथे भव्य परी* *मज भारी आईची झोपडी प्यारी*
अशा शब्दातून त्यांना *सागरास* काव्य स्फुरले.
28 मे 1833 रोजी नाशिक जिल्ह्यातील भगूर ह्या गावी या क्रांतीचा लखलखता तारा उदयास आला. वेदशास्त्रसंपन्न घराण्यात जन्म. त्यामुळे आहार-विहार, आरोग्य संपदा त्यावर आपोआपच प्रेम जडलेले सावरकर लहानपणापासूनच खूप हुशार. वयाच्या 13-14 व्या वर्षापासूनच ते काव्यही करू लागले. जीवनाच्या प्रत्येक अवस्थेत बाल्यावस्था. तारुण्यावस्था, वार्धक्य यात सावरकर एक झुंजार वीर पुरुष म्हणूनच राहिले. त्यांनी आपले सर्व आयुष्य *स्वतंत्रता देवीच्या* चरणी अर्पण केले. या स्वतंत्र देवतेचे स्मरण करताना ते म्हणतात,
*तुज साठी जनन ते मरण तुजविण मरण ते जनन*
*तुज सकल चराचर शरण*
त्यामुळेच तर श्री स्वातंत्र्यदेवतेच्या चरणकमलांच्या मधुगंध सेवनात समरसून जाणारे कवी सावरकर वयाच्या अवघ्या विशी तील अमरमरणाची सुंदर अनुभूतीच म्हणावी लागेल.
आपल्या या भारत देशाला जशी संतांची परंपरा तशीच देशभक्तांची ही परंपरा लाभली आहे. संतांची काव्य देवभक्ती ची तर सावरकरांच्या कविता या देशभक्तीच्या..
संतांनी..
*तुटो हे शरीर फुटो हे मस्तक*
अशी देह निष्ठा व्यक्त करीत ईश्वर भक्तीत देह झिजवला. तर सावरकरांनी *मी माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन*... म्हणत आपले सारे जीवन त्यांनी राष्ट्रासाठी समर्पित केले.
वेणी मध्ये जसे ताजी कोहिनूर पुष्प तसे हे भारतमातेचे मनोहरी सगुण स्वरूप पाहताना सावरकरांचे कविमन आनंदित होऊन जात... *परवशतेच्या नभात लखलखणारी चमचमणारी ही स्वतंत्रतेची चांदनी म्हणजे जणू सावरकरांच्या कवितेतील ध्रुवताराकाच* मनुष्यप्राणी हा देव देवतांच्या च श्रद्धेपोटी जशी त्यांची आरती गातो. तद्वत सावरकरांसारख्या या राष्ट्र भक्ताने *श्री शिवरायांना देवाचा दर्जा देत त्यांची आरती गायली*. रावण आणि राक्षसांचा श्रीरामाने वध केला. आणि भारत मातेचे परित्राण केले. तसे आता तिचे या म्लेंछां पासून संरक्षण करण्यासाठी श्री शिवप्रभूंनी अवतार घयावा... असं ही ते आरतीतून गात.. शिवरायांना भगवान संबोधून भगवदगीता ता सार्थ करायला तुम्ही पुन्हा यावे असंही त्यांना वाटतं.
बाजीप्रभू देशपांडे यांचा सावरकरांनी रचलेला पोवाडा स्वातंत्र्याच्या चळवळीला स्फूर्तीदायक ठरला असून अजूनही तो अखंड त्रिभुवनात गाजत राहिला आहे.
*स्वतंत्रते भगवती त्वामहम् यशोयुतां वंदे*
*स्वतंत्रते भगवती या तुम्ही प्रथम सभेमाजी
आम्ही गातसों श्री बाजींचा पोवाडा आजी
बाजीप्रभूंच्या वीर मरणाच्या अंतसमयाची पोवाड्यातून सांगता करताना ते म्हणतात *खबरदार यम दूता*
*पहुडे श्री बाजीप्रभू हा*
*स्पर्शू नकोस तद्द्वितद्य* *तेजपुंज दिव्य देहा*
मग बाजीप्रभूना ने ण्या साठी सूर्य, इंद्रादि देवता गंधर्व, खाली अवतरतात. या आणि अशा प्रत्येक काव्यातून राष्ट्रभक्ती ही त्यांच्या नसा नसात भिन लेली पहायला मिळते. संसार करून परमार्थ करावा यासाठी असलेला हा मनुष्यजन्म...
मात्र या वीर क्रांतीकारकांने म आपले आयुष्य देशासाठी अर्पण केलेलं होतं. जेव्हा 1906 झाली सावरकर हे विलायतेस निघाले माणसांपासून दूर जाताना अगोदरच मन विषन्न झालेलं त्यात इतका लांबचा प्रवास अशा वेळी फक्त समुद्र आणि आकाश या शिवाय कशाचे चे दर्शन होत नव्हते
त्यावेळी बोटींवर फिरताना त्यांनी आकाशाला तारकां ना उद्देशून सुचलेल्या तारकां स या काव्यात ते म्हणतात
*हे ताऱ्यांना जाणतसां का कोठुनी तुम्ही आला*
*कुठे चालला कवण हेतू हया प्रवासाला*
*आम्ही समुद्रगामि होतोय ते विशिष्ट हेतू ठेवून*
*मग तुम्ही कवण हेतू ज्या स्तव तुम्ही गगनगाम*
*सूर्यापासून इतके दूरचि भूने विचरावे अशा एक ना अनेक काव्यातून संवेदनशील मनाचा हा का कवी...
1910 साली त्यांना काळ्यापाण्याची जन्मठेपेची शिक्षा झाली... त्यावेळी अंदमान या बेटावर नेण्यात आले. तिथे असलेल्या जेलमध्ये त्यांना अत्यंत अमानुष हालअपेष्टा भोगाव्या लागल्या..... तरीही न डगमगता... येथील कैद्यांची सेवा करत..... त्यांनी आपली काव्य सरिता वाहवत ठेवली..
कारागृहाच्या भिंती वर कमला नावाचं काव्य त्यांनी साकारलं..
माझी जन्मठेप नावाच्या पुस्तकात त्यांनी या अंदमानातील दिवसांचे वर्णन केलेले आहे.... ते एखाद्या आत्महत्येस प्रवृत्त होणाऱ्या व्यक्तीने वाचावं आणि त्यांनी आत्महत्येचा विचार मनातून काढून टाकावा... इतकं वास्तव.... आणि समाजातील प्रत्येक घटकाला उद्विग्न ते पासून दूर नेणार असं हे आत्मचरित्र..
अंदमानात कैदेत असताना इथून आपल्याला पुन्हा भारतात कधीही जाता येणार नाही असं वाटत असतानाच अचानक त्यांना भारतात नेलं जातं.. त्यावेळी बोटीतून प्रवास करत असताना जेव्हा त्यांना दूरवर भारताचे दर्शन होते त्यावेळी ते आपल्या बंधूंना म्हणतात.... बाबा तो पहा पहा आपला भारत.....
निलसिंधूजलधऊत चरणतला असलेला हा आपला भारत..
अशा या भारत भूमीचा पुत्र, स्वातंत्र्यवीर, वि दा सावरकर यांना 26 फेब्रुवारी 1966रोजी स्वर्गीचेच बोलावणे आले....
त्यांच्या या पावन स्मृतीला विनम्र अभिवादन
Comments
Post a Comment