लेकीसाठी वैकुंठातुन

*लेकीसाठी वैकुंठातुन*👨‍👧                  
-----------------------------------
         भल्या पहाटे उठून काकडा भजनाने तुकाराम महाराजांच्या दिवसाची सुरुवात व्हायची. नित्याप्रमाणे पांडुरंगाचं नामजप करत स्नान करून विठ्ठलाची पुजा झाली.तुळसीला वंदन करून महाराज घराबाहेर पडत असताना जिजाबाईने जोरानं हाक दिली.
     काही काळजी आहे का संसाराची?पोरींची?तुम्हाला फक्त विठ्ठल विठ्ठल करायला पाहिजे. महाराज शांतपणे म्हणाले,आवले योग्य वेळ आल्यावर सर्व काही व्यवस्थित होत.योग्य वेळ येवू द्यावी लागते.परंतु जिजाबाईची नेहमीची कटकट ऐकून महाराज एकदिवशी जवळच यलवडी नावाचं गाव होतं. तिथे मुलगा पाहण्यासाठी गेले.तुकाराम महाराज आपल्या घरी आलेले पाहुन त्यांना खुप आनंद झाला. आणि महाराजांची मुलगी भागिरथी आपल्या घरी द्यायची हे जेव्हा त्यांनी ऐकलं तेव्हा आपल जिवन परिपूर्ण झालं, संतकुळातली मुलगी आपल्या घरात येणार म्हटल्यावर त्यांना अत्त्यानंद झाला. 
     अखेर लग्न झालं.भागिरथी महाराजांच्या गळ्यात पडून रडू लागली. महाराजांनी भागिरथीच्या  तोंडावरून हात फिरवला म्हणाले, नांदा सुखानं नांदा पण विसरू नको तु तुकाराम महाराजाची मुलगी आहे. भागिरथी नांदायला सासरी गेली. इकडे महाराजांच जीवन पुन्हा पुर्ववत सुरु झालं.भजन किर्तन नामस्मरण नित्य सेवा सुरु झाली. 
           भागिरथीचं यलवडी गाव जवळच होतं पण येणंजाणं नव्हतं.देहुची माळीण भाजी विकायला यलवडीला जायची. राञी देहुमध्ये झालेलं आपल्या बापाचं,तुकाराम महाराजांच किर्तन ऐकण्यासाठी भागिरथी माळीणबाईची आतुरतेने वाट पाहायची.महाराजांच किर्तन, उपदेश ऐकून भागिरथीचे डोळे  बापाच्या आठवणीनं भरून यायचे.माळीणबाईच्या रूपानं आपल्या पित्याचं,महाराजाचं रोज दर्शन होतय या भावनेनं भागिरथी  कृतकृत्य व्हायची.
        अखेर तो दिवस आला. तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमनाचा.फाल्गुन वैद्य द्वितीया, सोमवार चा दिवस होता. प्रथमप्रहर,प्रात:काळ.बीजेच्या दिवशी शेवटचं किर्तन केलं. गावातील सर्व लोकांचा निरोप घेतला.भागिरथी ला सांगाव,पण तिला माझं वैकुंठाला जाणं सहन होणार नाही.म्हणून तुकाराम महाराजांनी वैकुंठ गमन केलं. देहु गावचं रत्नं गेल.
        देहु गाव शोकसागरात बुडून गेल.सर्व निश्चल बसलेले.कुणाच कशात लक्ष लागत नाही.
पण शेवटी पोटापाण्यासाठी काहीतरी करावं लागतं म्हणून ती माळीणबाई यलवडी गावाला भाजी विकण्यासाठी निघाली. आणि जड पाऊलाने भागिरथीच्या दारात पोहोचली. बरेच दिवस माळीणबाई का आली नाही?माळीणबाई तुझा  चेहरा का उतरला?असा प्रश्न भागिरथीने माळीणबाईला विचारला.जड अंतकरणानं माळीणबाई म्हणाली,भागिरथी तुझे बाबा माझे गुरू,जगतगुरू तुकाराम महाराज बीजेच्या दिवशी सदेह वैकुंठाला गेले.
          आपले बाबा वैकुंठाला गेले हे ऐकून भागिरथी धायमोकलुन रडु लागली.परंतु बाबा मला न सांगता वैकुंठाला जाणार नाहीत या विचाराणं भागीरथीनं तुकाराम तुकाराम नामजप सुरू केला.आणि आपल्या कन्येचा आवाज ऐकुन तुकाराम महाराज वैकुंठात सावध झाले.नारायणाची परवानगी घेऊन भुतलावरच कार्य पुर्ण करण्यासाठी महाराज भागिरथीच्या घरी आले.
           भागिरथी असा आवाज दिला.वैकुंठाला गेलेल्या आपल्या बाबांचा आवाज ऐकुन भागिरथीने धावत येवून तुकाराम महाराजांना कडकडुन मिठी मारली,आनंदाश्रु घळघळ वाहु लागले.भागिरथीला शांत करत महाराज म्हणाले बाळा किती ञास करून घेतलास.तशी भागिरथी म्हणाली बाबा तुम्ही नाही तर जगण्यात अर्थ काय?कुणासाठी जगावं?तुकाराम महाराजांनी भागिरथीच्या तोंडावरून हात फिरवला.भागिरथी म्हणाली,बाबा मी तुमच्या आवडीचं गोडधोड जेवन करते.महाराज म्हणाले भागिरथी मी आता न जेवणा-या गावी गेलो.आपल्या भागिरथीला मायेनं जवळ घेतलं आणि वैकुंठाला जाण्याची परवानगी मागत,परत हाक मारू नको अशी विनंती केली.तशी भागिरथी म्हणाली, बाबा तुम्ही गेलाय अस वाटु देऊ नका,मी हाक मारणार नाही.भागिरथीला आशिर्वाद दिला.
             भागिरथीच जिवन परिपूर्ण झालं.हे बाप-लेकीच अलौकिक नातं आहे.मुलगी बापाला आईच्या मायेने जपत असते.बाप आपलं दु:ख आईच्या ह्रदयासमान लेकीला सांगुन मन हालक करत असतो.जगतगुरू तुकाराम महाराज आणि भागिरथीचं हे नातं बाप लेकीच्या अलौकिक नात्याचं ह्रदयस्पर्शी उदाहरण आहे.म्हणून अस म्हणतात कि बापाचं लेकीवर जरा जास्तच प्रेम असत,कारण एका *लेकीसाठी* एका बापालाही *वैकुंठहुन* यावा लागलं होतं !!

यासाठीच,
 मित्रानो,
 *बोलत राहा, भेटत राहा* . *"मरायच* सर्वांना आहे, परंतु ... *मरावंसं* कोणालाच वाटत नाही.. *आजची*  परिस्थिति तर फार गंभीर आहे.. *"अन्न"* सर्वांनांच हवंय..पण.. *"शेती"*  करावीशी कोणालाच वाटत नाही.. *"पाणी"* सर्वांनाच हवंय.पण.. *"पाणी"*  वाचवावे कोणालाच वाटत नाही.. *"सावली"* सर्वांनाच हवीय..पण.. *"झाडे"* लावावी व ती जगवावी असे कोणालाही वाटत नाही.. *"सुन"* सर्वांनाच हवीं आहे.. पण.. *"मुलगी"* व्हावी कोणालाच वाटत नाही... अन मुलगी असली का तीला लग्न झाल्यावर सासरी नांदू द्याची नाही... कोर्ट कचेरी करून सरळ कायद्याचा माघे लपून पैसे उकळायचे  अन परत दुसरं लग्न लावायचं  पुन्हा तोच कार्यक्रम कोर्ट.... ही निवळ भारतीय साधूसताचा  माय मातीला काळिमा फासणाऱ्या विचार सरणीतून हा मानव समाज कधी बाहेर निघेल ...*विचार*  करावा असे प्रश्न...पण.. *विचार* करावा असं कोणालाच वाटत नाही..हा मेसेज सर्वांना आवडतो परंतु *forward* करावा असं कोणालाच वाटत नाही.

🍃🍃🍃🙏 *श्री स्वामी समर्थ*🙏 🍃🍃🍃🌹

Comments

Popular posts from this blog

वर्ग ३ ,४ व ५ साठी माहिती लेखन उतारे (सराव कार्य)

वर्ग ३ कविता १. झोका , २. सिंह आणि कोल्हा व पाठ ३. आपण सारे खेळू गृहपाठ/स्वाध्याय  ( प्रश्न उत्तरे -गृहपाठ )

वर्ग ३. कविता १. झोका ( प्रश्न उत्तरे -गृहपाठ )