विश्वकल्याणार्थ वारीची

🚩⚜🚩🔆🕉🔆🚩⚜🚩

           🌻 *आनंदी पहाट* 🌻

          *विश्वकल्याणार्थ वारीची*
     
           *श्रीक्षेत्र अलंकापुरीतून*
         *संत ज्ञानोबांच्या पालखी* 
                  *प्रस्थानाची*
          
      ⚜️⚜️⚜️🚩⚜️⚜️⚜️
     *भक्ती चैतन्याची वारी पंढरीची*
      ⚜️⚜️⚜️🚩⚜️⚜️⚜️
                                                        
🌹⚜️🚩🔆🙏🔆🚩⚜️🌹

        *लोपलें ज्ञान जगी ।*
        *हित नेणती कोणी ।*
        *अवतार पांडुरंग ।*
        *नाम ठेविले ज्ञानी ॥*

       *या आहेत ज्ञानेश्वर माऊलींच्या आरतीतील ओळी. कधीकधी ज्ञान लोपले की आपण काय करतोय हेच समाजाला कळत नाही. मग अशावेळी ज्ञान प्रदान करुन समाजाला दिशा देण्यासाठी झालेला माऊलींचा जन्म.. त्यांनी केलेले अलौकिक समतेचे कार्य.. समाजाला दिलेले वळण.. समाजात परमेश्वराप्रती आणि एकमेकांप्रती.. प्रत्येक जीवा विषयी निर्माण केलेला पुज्य भाव बघता माऊली म्हणजे पांडुरंग अवतारच आहे असे वारकरी मानतात.*
        *वारी परंपरा जी ज्ञानेश्वरांच्या आधीपासून अव्याहत सुरू आहे. संत तुकोबांच्या घरीही पूर्वापार होतीच. ज्ञानेश्वर.. नामदेव समकालीन विश्वंभर बाबा हे संत तुकोबांचे पूर्वज. ते वारी करायचे. पूढे हैबतबाबांनी ज्ञानदेवांच्या पादुका पालखीत ठेवून पंढरपूर दिंडी पालखी सोहळा प्रथा मोठ्या थाटात प्रारंभ केला. हा पालखी सोहळा आजही सुरूच आहे.*
        *परमेश्वराला भेटायला जायचे तर कष्ट घ्यायलाच हवे. मग वारी नियमांचे पालन करुन पायीच पंढरपूरला जायचे ही वारी परंपरा. आज मनुष्य विमान वेगाने प्रवास करु शकत असला तरीही वारीत वारकरी पायीच शेकडो कि.मी. श्रद्धेने पायीच चालतात.. त्यात आनंद मानतात.*
        *पंढरपूरच्या पायी वारीत सर्वाना उत्सुकता असते ती ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी रथ केव्हा निघणार याची. याचे कारण सर्वच संत मंडळींही माऊलींना श्रेष्ठ मानतात. त्यांचा आदर करतात. माऊलीं पण सर्वांवर माते प्रमाणे माया करतात. सर्वच संतासोबत पंढरपूरला माऊली मार्गस्थ होतात. माऊलींचे हे सर्वांवर असलेले प्रेम.*
        *देवाची आळंदी.. अलंकापूरी. या नगरीतील विलोभनीय दृश्याचा हेवा अगदी देवांचा राजा इंद्रालाही वाटावा असे दृश्य आज इथे आहे. कुणालाही आमंत्रण न देता आज इंद्रायणी काठावर भक्तांची प्रचंड अशी वारकरी सेना जमलीय. पण कुणाजवळच शस्त्र नाहीय. या सेनेचे कुणालाही भय नाही, उलट ही सेना बघून होतो तो आनंद. प्रेमभाव रुजवण करणारी ही भक्तांची सेना. आसमंतात भगव्या पताकांचे राज्य. टाळ.. मृदुंग.. पखवाजासह एकच जयघोष होतोय.. "ज्ञानोबा माऊली.. तुकाराम".* 
        *सुगंधी फुलांनी सुशोभित असा माऊलींचा रथ.. तो अश्व, चोपदार.. वीणेकरी सारेच सज्ज आहेत. वारकऱ्यांचा उत्साह तर शिगेला पोहोचलाय. मंदिरात माऊलींच्या पादुकांचा अभिषेक.. पूजा झालीय. कीर्तन सुरु आहे. माऊलींनी प्रस्थानाचा कौल द्यावा यासाठी सारे आतूर आहेत. कौल मिळला हे लक्षात येताच वातावरणात चैतन्यच अवतरलेय.*
        *आता या विश्वाला एकच शब्द ठाऊक आहे.. तो म्हणजे विठ्ठलनामाचा. इंद्रायणी काठी भक्तमन आनंदलेय. मनाला उभारी लाभलीय. आता पांडुरंगाचे दिव्य रुप आठवून त्यांना जगाचा विसर पडणार.*
        *माऊलींचे अंतःकरण विशाल. त्यांचा संसार स्वतःपुरता नव्हताच. त्रिभूवन हे त्यांचे घर होते. जगातील सगळेच आप्तजन. माऊलींना जगतातील सर्वाना आनंदी बघायचे होते. या त्रिभूवनाचा कर्ता करविता राहतो पंढरपूरला. हे असे स्थान जिथे प्रत्येकाला आपले सुखदुःख सांगता येते.. आपुलकी.. जिव्हाळा.. प्रेम मिळते असे माहेर.* 
        *माऊली म्हणतात, मी या माहेरी जावून विठ्ठलाची विचारपूस करेल. त्याला जगातील दुःख सांगून ती दूर करण्याचे साकडे घालेल. आज जगाला गरज आहे ती शांततामय जीवनाची.. मानस्वास्थ उत्तम राखण्याची. हे लाभावे म्हणून त्यासाठी माझे जे काही सुकृत.. पुण्याई असेल ती त्याला अर्पण करेल. कारण मला हे त्रिभूवन आनंदमय करायचेच आहे. "अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक" हेच ज्ञानदेवांच्या जीवनाचे उद्दिष्ट.*
        *ही पंढरीची वारीही गावोगावच्या लोकांना आनंद देत सर्वांचे क्षेमकुशल.. निरोप विठ्ठलाकडे घेऊन निघाली आहे.*

🌹⚜️🚩🌸🛕🌸🚩⚜️🌹

  *अवघाची संसार सुखाचा करीन ।*
  *आनंदे भरीन तिन्ही लोक ॥१॥*

  *जाईन गे माये तया पंढरपुरा ।*
  *भेटेन माहेरा आपुलिया ॥२॥*

  *सर्व सुकृतांचे फळ मी लाहीन ।*
  *क्षेम मी देईन पांडुरंगी ॥३॥*

  *बाप रखुमादेवीवरू विठ्ठलेचे भेटी ।*
  *आपुले संवसाटी करुनी राहे ॥४॥*

🌺🥀🚩🌸🛕🌸🚩🥀🌺

  *रचना : संत ज्ञानेश्वर*  ✍
  *संगीत : मास्टर कृष्णराव*
  *स्वर : मधुवंती दांडेकर*
  *नाटक : संत कान्होपात्रा*

  🎼🎶🎼🎶🎼  🎧
 
     *॥ पुंडलिक वरदे हरी विठ्ठल ॥*
       *॥ श्री ज्ञानदेव तुकाराम ॥*
  *॥ पंढरीनाथ महाराज की जय ॥*

   ‼ *जय जय रामकृष्ण हरी* ‼

   🌹🙏 *सुमंगल प्रभात* 🙏🌹

                *११.०६.२०२३*

🌻🥀🚩🌸🛕🌸🥀🚩🌻

Comments

Popular posts from this blog

वर्ग ३ ,४ व ५ साठी माहिती लेखन उतारे (सराव कार्य)

वर्ग ३ कविता १. झोका , २. सिंह आणि कोल्हा व पाठ ३. आपण सारे खेळू गृहपाठ/स्वाध्याय  ( प्रश्न उत्तरे -गृहपाठ )

वर्ग ३. कविता १. झोका ( प्रश्न उत्तरे -गृहपाठ )