नव गावंची वास्तदर्शी किमया वास्तवदर्शी काव्य स्वरूपात

नमस्कार मंडळी,

        आज सर्व वाचक मंडळींसाठी एक नव्या विषयावर वास्तवदर्शी माहिती काव्य स्वरूपात घेऊन आलो आहे .

      आपण सर्व वाचक रसिक गुणीजण मंडळींनी माझ्या या छोट्याशा लेखन प्रयत्नाला  खूप प्रतिसाद दिला आहे. मी तुमचा आभारी .
      आजचा लेखन विषय थोडासा वेगळ्या स्वरूपातील आहे. आपल्या या ब्लॉगवर शब्द लेखन मर्यादा मोजक्या स्वरूपातली  असली तरी मात्र ती माहिती पूर्ण आहे .
   आजच्या युगात लोकांना वाचण्याची आवड आहे ; पण वेळे ची मर्यादा आहे. हा विचार ध्यानी ठेऊन आजचा वेगळा  विषय  लेखनासाठी हाती घेतला आहे.
           रसिक हो आजचा विषय हा एका छोट्याशा  गावाचा आहे.तंय गावाने गेल्या चार वर्षांत उल्लेखनीय प्रगती केली आहे. ही  सर्व प्रगती  आपली स्वतःची ओळख,स्वतःचे कार्य नियोजन ह्या तत्वांचा अभ्यास केल्यामुळे सर्व शक्य झाले. चला तर वाचूया वास्तवदर्शी काव्यातून वास्तवदर्शी गावाची ओळख....
  गाव- नगाव  ता.अमळनेर जि. जळगाव
 
            नवं गावची किमया

अमरनीरच्या पूर्वेला,चिखली नदी तिरी वसले नवं गाव ।

खडकाळ,ओसाड धरणीवर कोठेच नव्हता त्याचा ठाव ।।

असमानी,सुलतानी काळाने ,

घातला मोठा घाव ।

चिखली नदी ,खडकी नाला आदींनी सोडली साथ।।

संकटांना  न डरता एक जुटीने रोपे श्रमाची लावली।

आई बिजासनी कृपेला पावली ।

शिक्षणाची गंगा दारोदारीतून  उगवली।।

ज्ञान, अनुभवातूनी कृषी संपन्नतेचा ,सर्वांनी घेतला वसा।

आपल्या जिद्दीने ,कुवतीने राज्यात उमटवला ठसा ।।

 चिखलीचे जीवन भरण।

खडकी नाल्याचे  खोली करण।

खडकाळ जमिनीत तळ्यांचे नियोजन ।

साऱ्या विचारांची किमया झाली न्यारी।

जलमय झाली नवंगाव धरणी सारी ।

या धरणीवर पेटलेल्या हिरवळीच्या वातीने सारे झाले प्रकाशमान । साऱ्या जनतेने जगण्याचा मिळविला सन्मान ।
चहू बाजूनी झाले  सारे सुजलाम,सुफलाम ।।

कवी सुबाल
दि.१/०७/२०१६
 वेळ सकाळी ६.०० वाजता.

               लेखा संदर्भात आपल्या प्रतिक्रिया कळवा.
लेखक- प्रा.श्री लक्ष्मण बालू पाटील(कवी सुबाल)
चलभाष- ९५५२९१८०६३
  भेटूया पुढील लेखात  एक नवा विषय घेऊन तो पर्यंत नमस्कार.






Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वर्ग ३ ,४ व ५ साठी माहिती लेखन उतारे (सराव कार्य)

वर्ग ३ कविता १. झोका , २. सिंह आणि कोल्हा व पाठ ३. आपण सारे खेळू गृहपाठ/स्वाध्याय  ( प्रश्न उत्तरे -गृहपाठ )

वर्ग ३. कविता १. झोका ( प्रश्न उत्तरे -गृहपाठ )