सात जन्माची पुण्याई । म्हणुनी आज मिळाली आई ।।

    नमस्कार मंडळी  आपल्या आवडत्या ब्लॉकवर आपले स्वागत आहे .
    मंडळी मागील काव्य लेखनास आपण वाचन प्रेमी मंडळींनी  खूप प्रतिसाद दिला.
   आज आपल्यासाठी नाविन्यपूर्ण अशी वास्तवदर्शी व दिनविशेष पर आधारित काव्य रचना या ब्लॉकवर घेऊन आलो आहे.
एकदा  नक्की वाचा. व प्रतिक्रिया द्या.

'सर्व  मातांसाठी शुभेच्छा संदेश'

कविता - 'आई' 
                  (मातृ गौरव दिन)

प्रेम मूर्ती ,त्यागमूर्ती कष्ट मुर्ती तू आई ।
सप्तनभीच्या तारकांचें तेज तू आई ।।
हिम गिरीच्या शितलतेची छाया तू आई।
आभाळतील काळ्या नगातील जल धारा तू आई ।
खड्ग सम धारदार ,कणखर  तू आई।
संकटसमयी ढाल होऊनी, धैर्य दावी तू आई।
माझी ममता, सदाची  समता, तू आई।
अंगी नम्रता, हृदयी वात्सल्यता, वाणी मधुरता तू आई।
करुणा सागर, संस्कार नागंर, तू आई।
प्रेमाचा पाझर, कर्तव्याचा जागर, तू आई।
झुळझुळ खळखळ  शीतल पाणी, गोड गोड अमृत वाणी, तू आई।
 कर्तव्याचा व्हावे मी धनी,  नित्य असे हे तुझ्या मनी, हे स्वप्न साकार करण्यास तू आई।
माझी काय, तुझी छाया, नित्य सद्गुणांचा पाया, तू आई।
नित्य दिनी, माझ्या ध्यानी मनी, हृदयी वसे तू आई।
सप्तजन्म तुझा मी तान्हा, माझी सावली तू आई।
संस्कार  शुभ्र,मधुर  पान्हा,  माझी माऊली, सदा तू आई ।
 देऊनी ढेकर तुप्तीचा,
 दास  सुबाल माय चरणीचा,
 आशीर्वाद तुझा जन्मोजन्मीचा
सदा  देई   तू   आई।
वाचा नित्य माझी, नाम महिमा  तुझी,  मुखी गाई ।
या वासरांसाठी, मृत्यु शेवटी हंबरतात  निस्वार्थी या गाई ।।

कवी सुबाल
दि.१०/५/२०२०
वेळ ३.१६ दुपारी

मातृदिनाच्या सर्व जगतमातांना लाख लाख शुभेच्छा💐💐💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻

Comments

  1. तुमची कविता वाचून एका कवीच्या कवितेची आठवण झाली..
    माय माय करू किती, गाऊ तुझे गुण
    माझं चांदण्यांचं जीन माझं चांदण्यांचं जिणं

    छान असेच लिहीते राहा....

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वर्ग ३ ,४ व ५ साठी माहिती लेखन उतारे (सराव कार्य)

वर्ग ३ कविता १. झोका , २. सिंह आणि कोल्हा व पाठ ३. आपण सारे खेळू गृहपाठ/स्वाध्याय  ( प्रश्न उत्तरे -गृहपाठ )

वर्ग ३. कविता १. झोका ( प्रश्न उत्तरे -गृहपाठ )