मराठीतील वास्तवदर्शी लेखन प्रवाहातील अनोखी कादंबरी 'मी गोष्टीत मावत नाही' या वर कवी सुबाल यांचे वास्तवदर्शी काव्य लेखन

        नमस्कार मंडळी, आज आपल्या ब्लॉकवर नव्या वास्तवदर्शी साहित्यावर नवा साहित्य रंग वाचण्यास घेऊन आलो आहे.
    खास आपल्यासारख्या वाचक प्रिय बंधू-भगिनिंसाठी.........
     मंडळी काव्य लिहण्याआधी आपण , ही काव्य निर्मिती  कशी घडली, त्या विषयी माहिती वाचूया!
      मंडळी आज गोष्ट आहे ,व्यक्तीची, व्यक्तीच्या वास्तवदर्शी जीवनाची. आपलं आयुष्य , जीवन जे कधीच गोष्टीत मावणारं नाही. मी बोलत आहे ,लिहीत आहे, अशाच कादंबरी विषयी...
     मराठी भाषेच्या साहित्य प्रकारात कादंबरी नावाचा एक साहित्य प्रकार आहे. त्या प्रकारात लाखोंच्या वर कादंबऱ्याची निर्मिती आज मितिस झाली आहे. त्यांचे प्रकार ,विषय अनेक प्रकारचे आहेत. त्यात सामाजिक,राजकीय,ग्रामीण, हे प्रमुख प्रकार होत.
      मी आज ज्या कादंबरी विषयी माहिती आपणास देणार आहे , ती कादंबरी म्हणजे  लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे लिखित 'मी गोष्टीत मावत नाही' ही होय.
      ही कादंबरी म्हणजे मराठी साहित्य क्षेत्रातील आजवरच्या कादंबरी लेखनातील नवं लेखन विश्व होय. वाचक ह्या कादंबरीला एक क्षण कादंबरी म्हणू शकणार नाही. या पुस्तकाला कोणत्या प्रकारात स्थान द्यावे ,हे देखील सुचनार  नाही. पण ही कादंबरी मराठी भाषेतील कादंबरी लेखनातील नवा प्रवाह निर्माण करणारी कादंबरी ठरली आहे.
      ज्या प्रमाणे डॉ. भालचंद्र नेमाडे लिखित  'कोसला'-  'एक जगण्याची अडगळ' या कादंबरीला कादंबरी लेखन क्षेत्रातील एक नवा प्रवाहचे लेखन म्हणून स्थान मिळाले, तसेच ' अनेक उच्च सन्मान प्राप्त मिळणारे पुस्तक'  असे  कादंबरी चे स्थान निर्माण झाले ; तसे स्थान घेऊ पाहणारी ही कादंबरी आज वाचताना दिसत आहे.
   'मी गोष्टीत मावत नाही' कादंबरीवर आधारित वास्तवदर्शी काव्य लेखन खास आपण वाचक रसिक प्रेमींसाठी  प्रस्तुत.  हे काव्य व कादंबरी आपण आवर्जून वाचावी व प्रतिक्रिया द्याव्यात..

         कविता - 'मी वास्तवातील' 
मी गोष्टीतला नाही , गोष्ट माझ्यातील नाही,
अंतरीच्या खुणांनी 'थेंब - थेंब' जुळूनी या नित्य मी पाही  ||धृ||
आज अबोल,तरी 'मी' चा ध्यास मनी असे काही ||
मार्गे  अस्तित्वाची शोधूनी पुढे मी सदा जाई ||१||
खडतर हया रस्त्यावरी अनवाणी काटे,कुंपणे सदोदित राही ||
चाल चालतो मनीची आस,ध्यास घेऊनी मी पायी ||२||
दुःख यातना, जन्मोजन्मीच्या  वसे, स्वपनीचे  दिसे अंतरी ,
यशाच्या यशस्वी डोंगरी मार्गवरी , क्षणोक्षणी मी चाली ,
कर्तृत्वाच्या घामाने, सत्य, प्रामाणिक कर्माने दिसे मी बाहेरी || ३ ||
 माणुसपणाची जिवंत घेऊनी आलो जीवनी, वाघेरी ती ही  मोगराई ||
माझी मला मिळाली लेखनीतून  घामाची मधुराई ||४| |
मस्तीचा, दांडगाईचा वसा सदा टाकुनी  नित्य सुरु संगीत  स्वराई ||
अंधाऱ्या झोळीत आस धरूनी उभी यशाई ,
अंतरी सर्वार्थ जागृत नित्य होऊनी सदा ती पाही ||५||
लेखणीची धार, शब्दांचे अस्त्र-वाग्यज्ञाची नित्य हवनाई ||
चारो गगनात यश समृद्धी  कलश जीवनात आपहुनी आपसुख येई ||६||

कवी- सुबाल   (वास्तवदर्शी कवी)                प्रा.श्री लक्ष्मण बालू पाटील.                   लेखन दिनांक - ९.९.२०१९
 वेळ- रात्री ९.३० मी.
 
     कृपया सर्व वाचक मंडळींनी आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात...
प्रा.श्री लक्ष्मण बालू पाटील (कवी सुबाल)
चलभाष : - ९५५२९१८०६३

Comments

Popular posts from this blog

वर्ग ३ ,४ व ५ साठी माहिती लेखन उतारे (सराव कार्य)

वर्ग ३ कविता १. झोका , २. सिंह आणि कोल्हा व पाठ ३. आपण सारे खेळू गृहपाठ/स्वाध्याय  ( प्रश्न उत्तरे -गृहपाठ )

वर्ग ३. कविता १. झोका ( प्रश्न उत्तरे -गृहपाठ )