कवी सुबाल
 नमस्कार , माझ्या सर्व वाचक प्रेमीचं हार्दिक स्वागत .आज मी या नव्या तंत्रज्ञान क्षेत्रात साहित्य लेखनाचे नवे पाऊल टाकत आहे. रोज या ब्लॉगवर मराठी, हिंदी  वास्तवदर्शी कविता प्रकाशित करणार आहे.
     तरी आपण या काव्य मेजवणीत सह कुटुंब आमंत्रित आहात.
       वास्तवदर्शी कवी सुबाल यांची काव्य मेजवानी..

सुविचार - एकदा तरी वाचा, स्वानंदे मनी नाचा ।। कवी सुबाल

कविता-  प्रार्थना

हे जगदीश्वरा नित्य मनी प्रार्थना तुला।।धृ।।
रविकिरण प्रभेची सोनेरी  कडा।
सदाचरणाचा नित्य उचलला मी विडा।।
हे जगदीश्वरा, नित्य मनी प्रार्थना तुला।।धृ।।
जीवनमूल्ये, जीवन घडविण्याची मनी आस।
सुसंस्कृत मन, घडविण्याचा मनी ध्यास।
हे जगदीश्वरा, नित्य मनी प्रार्थना तुला।।धृ।।
प्रितीची सदा गोडी,हस्त कमल नित्य जोडी।
भेदभाव,दंभ मनीचा, हृदयातून काढी।
हे जगदीश्वरा, नित्य मनी प्रार्थना तुला।।धृ।।
जीवन समृद्धी, दृष्टी सदा तू देई।
सदमार्गावरी आज मन बुद्धी तू नेई।।
हे जगदीश्वरा, नित्य मनी प्रार्थना तुला ।।धृ।।
 ज्ञान रुपी वसा, नि:स्वार्थाचा तू   ठसा।
मन सुबाल हे , नित्य अर्पण सदमार्गाला ।
हे जगदीश्वरा, नित्य मनी प्रार्थना तुला ।।धृ।।

🙏🏻कवी सुबाल 🙏🏻
लेखन दि. 28/4/2020 सकाळी 6.15 वार - मंगळवार
काव्य संग्रह -प्रार्थना
प्रा.लक्ष्मण बालू पाटील
चलभाष-९५५२९१८०६३

Comments

  1. खूपच सुंदर कविता कवी सुबाल माझ्या मनपूर्वक शुभेच्छा तुमच्या या नव्या पर्वाला...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वर्ग ३ ,४ व ५ साठी माहिती लेखन उतारे (सराव कार्य)

वर्ग ३ कविता १. झोका , २. सिंह आणि कोल्हा व पाठ ३. आपण सारे खेळू गृहपाठ/स्वाध्याय  ( प्रश्न उत्तरे -गृहपाठ )

वर्ग ३. कविता १. झोका ( प्रश्न उत्तरे -गृहपाठ )