१३ जुलै - कवयित्री इंदिरा संत जन्मदिन

 


१३ जुलै - कवयित्री इंदिरा संत जन्मदिन


जन्म - ४ जानेवारी १९१४

स्मृती - १३ जुलै २०००


इंदिरा संत या मराठी कवयित्री आणि कथालेखिका होत. पूर्वाश्रमीच्या इंदिरा दीक्षित असलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला. १९५०च्या दशकात त्यांनी स्त्रीवादी कविता लिहण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. आई, पत्नी, मुलगी या नात्यांतून भारतीय स्त्रीचे दिसणारे खडतर जीवन त्यांनी आपल्या कवितांमधून हळुवारपणे मांडले आहे. 


इंदिरा संत आणि त्याचे पती ना.मा. संत या दोघांच्या कवितांचा एकत्रित असा संग्रह 'सहवास' या नावाने १९४० ला प्रसिद्ध झाला. विशुद्ध रूपातील इंदिरा संत यांची कविता टीकाकार तसेच काव्यरसिकांनी उचलून धरली. 


आजमितीस इंदिरा संत यांची सुमारे पंचवीस पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. रमेश तेंडुलकर यांनी इंदिरा संत यांच्या निवडक कविता 'मृण्मयी' नावाने १९८२ साली संपादित करून प्रसिद्ध केल्या आहेत. 


इंदिरा संत यांचे १३ जुलै २००० रोजी निधन झाले. 


मा. इंदिरा संत यांना आदरांजली !

Comments

Popular posts from this blog

वर्ग ३ ,४ व ५ साठी माहिती लेखन उतारे (सराव कार्य)

वर्ग ३ कविता १. झोका , २. सिंह आणि कोल्हा व पाठ ३. आपण सारे खेळू गृहपाठ/स्वाध्याय  ( प्रश्न उत्तरे -गृहपाठ )

वर्ग ३. कविता १. झोका ( प्रश्न उत्तरे -गृहपाठ )