वर्ग ५ वी पाठ ४ ही पिसे कोणाची? प्रश्न उत्तरे
पाठ ४ ही पिसे कोणाची? प्रश्न १. एक वाक्यात उत्तरे लिहा. (अ) मिनूचे घर कोठे होते? (आ) मिनू कोणाकोणाला भेटली? (इ) मिनूला बदकाचा पत्ता कोणी सांगितला? (ई) पिसे कोणाची होती? (उ) मिनूने बदकाला काय सांगितले? उत्तर: (अ) मिनूचे घर शेतात होते. (आ) मिनू कोंबडीताई, कबुतरदादा, मोर व शेवटी बदकाला भेटली. (इ) मिनूला बदकाचा पत्ता मोराने सांगितला. (ई) पिसे बदकाची होती. (उ) मिनूने बदकाला सांगितले की, “तुझी पिसं मला सापडली आहेत. मी तुला शोधत होते, ही घे तुझी पिसं.” प्रश्न २. रिकाम्या जागी जुळणाऱ्या योग्य पर्यायापुढे ‘✓’ अशी खुण करा. प्रश्न 1. पिसे सापडल्यावर मिनूला …………………………….. उत्तर: (अ) पिसे कोणाची आहेत हे माहीत करून घ्यायचे होते. [✓ ] (ब) पिसे घरी न्यायची होती. [ ] 3. जोड्या जुळवा. प्रश्न 1. जोड्या जुळवा. उत्तर: ‘अ’ गट ‘ब’ गट 1. बदक (अ) झाड 2. कोंबडी (आ) नदी 3. कबुतर (इ) खुराडे 4. उदाहरणे वाचा. त्याप्रमाणे लिहा. प्रश्न 1. खाली दिलेल्या उदाहरणाप्रमाणे शब्दांना प्रत्यय लावून शब्द तयार करा. उदाहरणे – घर – घरापासून, घर – घराजवळ, खुराडे – खुराड्यात गाव तळे पाय घरटे उत्तर: गावापासून तळ्यात...



Comments
Post a Comment