Posts

वर्ग ३ गमतीशोध प्रश्न उत्तरे

Image
 प्रश्न १.  चित्र बघ ,त्यातील गमती शोध व सांग. १.वाघाला पंख आहेत. २.पक्षी मोबाईलवर बोलत आहेत. ३.उंदीर मांजराच्या मागे पळत आहे. ४.कोंबडीला शिंगे आहेत. ५.कासव झाडावर चढत आहे. ६.कोल्हा संगणक चालवत आहे. ७.मेंढीला तुरा दाखवला आहे. प्रश्न २. चित्रातील घटकांची नावे लिहा. जंगल , झाडे, पक्षी, प्राणी, संगणक  प्रश्न ३.  खालील   नुसार योग्य निवड करा. शब्द- घुबड , कोंबडी, वाघ , कोल्हा, कासव, मेंढी, मांजर , उंदीर. पाळीव प्राणी कोणते? - मांजर पाळीव पक्षी कोणता? - कोंबडी हिंसक प्राणि कोणता? - वाघ जंगलात राहणारे प्राणी?  -  वाघ, कोल्हा झाडावर बसणारे कोण? - पक्षी

वर्ग ३ ,४ व ५ साठी माहिती लेखन उतारे (सराव कार्य)

१. माझा वाढदिवस  माझ्या वाढदिवशी मला खूप आनंद होतो. या दिवशी आईबाबा घर सजवतात. मला नवीन कपडे आणतात. माझ्या वाढदिवसाला माझे सर्व मित्र घरी येतात. आईबाबा सगळ्यांना खाऊ वाटतात. आम्ही खूप मजा करतो, गाणी म्हणतो. गोष्टी सांगतो. दादा सगळ्यांचे फोटो काढतो. मला माझा वाढदिवस आवडतो. या दिवशी सर्वजण माझे लाड करतात. २. माझी आई माझी आई माझ्यावर खूप प्रेम करते. ती नेहमी माझी काळजी घेते. मला शाळेत जायला मदत करते. माझा अभ्यास घेते. माझी आई जेवण छान करते. तिच्या हातचे जेवण सगळ्यांना आवडते. ती खूप काम करते, घर स्वच्छ ठेवते. माझी आई गाणेपण छान म्हणते. अशी ही माझी आई किती चांगली आहे! मला ती खूप खूप आवडते. ३. माझे बाबा माझे बाबा रोज सकाळी लवकर उठतात. थोड्या वेळाने ते कामावर जातात. माझे बाबा नेहमी कामात असतात, त्यांना नीटनेटकेपणा आवडतो. ते माझा अभ्यास घेतात. आईलाही कामात मदत करतात. माझे बाबा माझ्याशी खेळतात. मला गोष्टी सांगतात. मला त्यांनी एक सायकल आणली आहे. ते माझे खूप लाड करतात. ४. माझी मातृभाषा मराठी ही माझी मातृभाषा आहे. आम्ही घरी मराठीत बोलतो. आम्ही दूरदर्शनवर मराठी कार्यक्रम बघतो. आमच्याकडे मराठी व...

एकदा स्वर्गातून घोषणा

एकदा स्वर्गातून घोषणा करण्यात आली की देव सफरचंद वाटायला येत आहेत.सर्व माणसे देवाच्या प्रसादासाठी रांगेत उभी होती.एक लहान मुलगी खूप उत्सुक होती, कारण ती पहिल्यादा देवाला बघणार होती.ती देवाची कल्पना करत मनातल्या मनात खूप खूश होती.देव रांगेतल्या लोकांना सफरचंद वाटू लागले,तीचा क्रमांक आला,देवाने तिला मोठं आणि लाल सफरचंद दिलं ती रांगेतून बाहेर पडताच तीच सफरचंद हातातून निसटून ते चिखलात पडलं.मुलगी उदास झाली._     _आता तिला दुसऱ्यांदा रांगेत राहावं लागणार दुसरी रांग पहिल्यापेक्षा लांब होती, परंतु दुसरा कोणताच मार्ग नव्हता.सर्व लोक प्रामाणिकपणे रांग लावून प्रसाद घेऊन जात होते.शेवटी ती मुलगी पुन्हा रांगेत लागली आणि तिचा क्रमांक येण्याची वाट पाहू लागली.अर्ध्या रांगेतच सफरचंद संपत आले.मुलगी उदास झाली.तिला वाटलं आपण येईपर्यंत सफरचंद संपतील परंतु तिला माहीत नव्हते की देवाचं भांडार कधी रिकामे होत नाही._     _तिचा क्रमांक आला तोपर्यंत आणखी नवे सफरचंद आले.देवाने तिच्या मनातलं ओळखलं ते तिला सफरचंद देत म्हणाले की पहिल्यादा जे सफरचंद दिलं होतं ते एका बाजूने सडलेले होत तुझ्यासा...

देव कुठे आहे?

१) देव कुठे आहे? २) देव काय पाहतो? ३) देव काय करतो? ४) देव केव्हा हसतो? ५) देव केव्हा रडतो? ६) देव काय देतो? ७) देव काय खातो? १) देव कुठे आहे? – जसे दुधात तूप कुठे आहे? तर दुधात तूप सर्वत्र आहे. तसेच देव सर्वत्र आहे. सर्व देशात, सर्व काळात व सर्व वस्तूत आहे. तो नसे ऐसा ठाव असे कवण | सर्वत्र संपूर्ण गगन जैसे ||  २) देव काय पाहतो? – जसे दिवा कुठे पाहतो? तर सर्व ठिकाणी पाहतो. तसा देव सर्वांना पाहतो. त्याचे डोळे विशाल आहेत. ‘मनोजगर्वमोचनं विशाललोल लोचनं’ |  त्याच्या दृष्टीतून काहीसुद्धा सुटू शकत नाही. ना खारुताईची सेवा ना मांडव्य ऋषींनी काजव्यास केलेली दुखापत. कोणी असं समजू नये मला कोणी पाहत नाही. तो सर्वांना आणि सर्वत्र पाहतो. ३) देव काय करतो? – भक्तांचा सांभाळ व दुष्टांचे निर्दालन. घेऊनिया चक्र गदा | हाची धंदा करितो || भक्ताराखे पायापाशी | दुर्जनासी संहारी ||  ४) देव केव्हा हसतो? – जीव जेव्हा जननीच्या उदरात असतो तेव्हा देवास सांगतो, "या संकटातून मला सोडव. मी तुझा अंश आहे." जीव म्हणतो, "सोहं, तू आणि मी समान." पण जीव जेव्हा संकटातून सुटतो, बाहेर येतो तेव्हा म्हणतो, कोहं...

सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?- लोकमान्य टिळक यांची विशेष माहिती

*सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?* _“मनुष्य स्वभावतः कितीही चांगला असला तरी शिक्षणाने त्याच्या बुद्धीचा विकास झाल्याशिवाय देशाची उन्नती होत नाही...”_ ---- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक         स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार या चतु:सूत्रीच्या जोरावर टिळकांनी राष्ट्रभक्तीची लाट निर्माण केली. त्यांनी राष्ट्रीय शिक्षणाचा विचार सांगून तो कृतीत आणला.         विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि टिळकांनी 1 जानेवारी 1880  रोजी 'न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. त्यांनी विनावेतन शिक्षकी पेशा पत्करला. 1884 मध्ये त्यांनी आगरकरांसोबत 'डेक्कन एज्युकेशन सोसायटी'ची स्थापना केली. याच संस्थेमार्फत 1885 ला फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली. यात ते गणित आणि संस्कृत विषय शिकवित.        जनतेला स्वातंत्र्य चळवळीसाठी उद्युक्त करून सामाजिक परिवर्तन घडविण्यासाठी 1881 साली मराठी भाषेतून 'केसरी' आणि इंग्रजीतून 'मराठा' हे वृत्तपत्रे सुरु केली. 1882 साली भारतातील सर्वाधिक खप असलेले 'केसरी' हे वर्तमानपत्र होते. त्यातील टिळकांचे 'अग्रलेख' हा केसरीचा आत्...

वर्ग ३ कविता ४. वारांचे गाणे :- प्रश्न उत्तरे

वर्ग ३ कविता ४. वारांचे गाणे - प्रश्न उत्तरे शब्दार्थ वार :- दिवस, दिन, वासर गाणे :- गीत गप्पा :- बोलणे  गोष्टी :- कथा आवड:- पसंत कृती:- क्रिया परिसर :- सभोतालचे वातावरण शिकणे :- अध्ययन निरीक्षण:- एकटक पाहणे माती:- मृदा दंग :- मग्न भाषण :- बोलणे बाल सभा :- लहान मुलांचा एकत्र आलेला गट ,ज्यात सर्व मुले बोलण्यासाठी तयार असतात./ लहान मुलांचा समूह पान :- पर्ण फुल :-  पुष्प झाड :- वृक्ष सफर :- फिरणे प्रश्न १. सात वारांची नावे लिहा. सोमवार, मंगळवार, बुधवार,गुरुवार,शुक्रवार,शनिवार,रविवार. प्रश्न २. वारांचे गाणे ही कविता सुंदर अक्षरात लिहा. :- सुंदरक्षरात कविता लिहा. प्रश्न ३. पंचाक्षरी/पाचक्षरी वार कोणता? :~  पंचाक्षरी वार मंगळवार आहे. प्रश्न ४. सोमवार नंतर दोन दिवसांनी येणारा वार कोणता? :-सोमवार नंतर दोन दिवसांनी येणारा वार बुधवार आहे. प्रश्न ५. गाणी गप्पा गोष्टींचा वार कोणता? :- गाणी गप्पा गोष्टींचा वार सोमवार आहे. प्रश्न ६. निरीक्षणाचा वार कोणता? :- निरीक्षणाचा वार मंगळवार आहे. प्रश्न ७. बालसभा कोणत्या दिवशी जमली? :- बालसभा गुरुवार या दिवशी जमली. प्रश्न ८. कवायत कोणत्या दिवशी ...

शिरपूर तालुका खान्देश साहित्य संघाचे कवी संमेलन उत्साहात संपन्न ..

Image
शिरपूर तालुका खान्देश साहित्य संघाचे कवी संमेलन उत्साहात संपन्न .. शिरपूर :- दि.२७ जुलै रोजी खान्देश साहित्य संघ शिरपूर द्वारा आयोजित कवी संमेलन उत्साहात संपन्न झाले.    खान्देश साहित्य संघ द्वारा  मासिक काव्य संमेलन आयोजित केले जाते. प्रत्येक संमेलनात विषय ठरवून तालुक्यातील निमंत्रित  जेष्ठ साहित्यीक कवी यांना आमंत्रित केले जाते व त्यांच्या  अनुभव व भाव विश्वातून साकार झालेल्या नव्या काव्य ज्योतींचा प्रकाश सर्व समान्य वाच, श्रोत्यांपर्यंत ध्वनीफीत, चित्रफीत द्वारे काव्य संकलन करून पोहचविले जाते.  या उपक्रमात श्रोते प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या आपला सहभाग नोंदवतात.    या काव्य मैफिलचे आयोजन प्रेमकमल वसाहतीतील प्रा.डॉ.नागोराव डोंगरे यांच्या निवासस्थानी करण्यात आले होते. कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थान सौ शिल्पाताई प्रसन्न जैन यांनी भूषविले तर कवी संमेलनाचे प्रास्ताविक शिरपूर तालुका खान्देश साहित्य संघाचे अध्यक्ष मा. श्री  के.बी. लोहार यांनी केले.      कवी संमेलनात उपस्थित कवींनी आपल्या स्वरचित पाऊस विषयावरील कवितांचे गायन ...