पंढरीचे वारकरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *पंढरीचे वारकरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज* 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 महाराष्ट्रात वारकरी सांप्रदाय हा अनादी कालापासून चालत आलेला सांप्रदाय आहे.या वारकरी सांप्रदायातच संत ज्ञानेश्वर महाराजांपासून संत तुकाराम महाराजांपर्यंत पुष्कळसे संत होऊन गेले. आणि त्याच वारकरी परंपरेतील विदर्भातील एक महान संत म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे सुद्धा पंढरीचे वारकरी व वारकरी संतच होते. महापुरुष दुर्लभ असतो व आपण सामान्यपणे त्यांना ओळखू शकत नाही.खरा सत्पुरुष आत्मप्रौढी पासून दूर असतो आणि प्रसिद्धी परान्मुख असतो.आपले तप,ज्ञान,अध्यात्मानुभव यांचा वाजागाजा करीत नाहीत.म्हणूनच त्यांचे विचार सामान्यांना एकदम समजत नाहीत.म्हणूनच राष्ट्रसंत वारकरी संत असूनही ते सामान्य जनांना समजलेच नाहीत.वारकऱ्यांची मुख्य लक्षणे कोणती याचा प्रथम विचार करू. *वारकऱ्यांची मुख्य लक्षणे* :- १)वारकऱ्यांचे दैवत श्री विठ्ठल. २)पंढरपूरची नित्यनेम वारी. ३)तुळशीची माळ गळ्यात घालणे व गोपीचंदन लावणे. ४)एकादशी व्रत. ५)रामकृष्णहरी या नाममंत्राचा जप करणे. ६)संतसंग . ७)ज