कविता १. झोका ( प्रश्न उत्तरे -गृहपाठ ) सदर कार्य मराठीच्या वहीत लिहा. वर्ग ३. कविता १. झोका प्रश्न १. एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. दोर कशाचा आहे? उत्तर:- दोर सुताचा आहे. आ. दोर कुठे टांगला आहे? उत्तर:- झाडावर सुताचा दोर टांगला आहे. इ. झोक्यावर कोण बसले आहे ? उत्तर:- झोक्यावर बाळू बसला आहे. प्रश्न २. कोण ते ओळखा. अ. झोक्यावर बसणारा- बाळू आ. झोका देणारी - ताई इ. दुरून बघणारे कोण?:- बाबाआई ई. अंगावर पडणारे- फुले व्याकरण प्रश्न ३. समानार्थी शब्द लिहा. अ. झाड - वृक्ष आ. भाऊ - बंधू इ. फुल - पुष्प ई. बहीण /ताई - भगिनी उ. आभाळ - आकाश ऊ. चांदोबा - चंद्र,शशी प्रश्न ४. विरुद्धार्थी शब्द लिहा. अ. आई X वडील आ. मागे X पुढे इ . मुलगा X मुलगी ई . चंद्र X सूर्य उ. जमीन X आकाश प्रश्न ५. वचन बदला. एक वचन अनेक वचन अ. झाड - झाडे आ. मुलगी - मुली इ. मुलगा...
Comments
Post a Comment