Posts

Showing posts from August, 2022

वर्ग ३ ,४ व ५ साठी माहिती लेखन उतारे (सराव कार्य)

१. माझा वाढदिवस  माझ्या वाढदिवशी मला खूप आनंद होतो. या दिवशी आईबाबा घर सजवतात. मला नवीन कपडे आणतात. माझ्या वाढदिवसाला माझे सर्व मित्र घरी येतात. आईबाबा सगळ्यांना खाऊ वाटतात. आम्ही खूप मजा करतो, गाणी म्हणतो. गोष्टी सांगतो. दादा सगळ्यांचे फोटो काढतो. मला माझा वाढदिवस आवडतो. या दिवशी सर्वजण माझे लाड करतात. २. माझी आई माझी आई माझ्यावर खूप प्रेम करते. ती नेहमी माझी काळजी घेते. मला शाळेत जायला मदत करते. माझा अभ्यास घेते. माझी आई जेवण छान करते. तिच्या हातचे जेवण सगळ्यांना आवडते. ती खूप काम करते, घर स्वच्छ ठेवते. माझी आई गाणेपण छान म्हणते. अशी ही माझी आई किती चांगली आहे! मला ती खूप खूप आवडते. ३. माझे बाबा माझे बाबा रोज सकाळी लवकर उठतात. थोड्या वेळाने ते कामावर जातात. माझे बाबा नेहमी कामात असतात, त्यांना नीटनेटकेपणा आवडतो. ते माझा अभ्यास घेतात. आईलाही कामात मदत करतात. माझे बाबा माझ्याशी खेळतात. मला गोष्टी सांगतात. मला त्यांनी एक सायकल आणली आहे. ते माझे खूप लाड करतात. ४. माझी मातृभाषा मराठी ही माझी मातृभाषा आहे. आम्ही घरी मराठीत बोलतो. आम्ही दूरदर्शनवर मराठी कार्यक्रम बघतो. आमच्याकडे मराठी वर्तम

एकदा स्वर्गातून घोषणा

एकदा स्वर्गातून घोषणा करण्यात आली की देव सफरचंद वाटायला येत आहेत.सर्व माणसे देवाच्या प्रसादासाठी रांगेत उभी होती.एक लहान मुलगी खूप उत्सुक होती, कारण ती पहिल्यादा देवाला बघणार होती.ती देवाची कल्पना करत मनातल्या मनात खूप खूश होती.देव रांगेतल्या लोकांना सफरचंद वाटू लागले,तीचा क्रमांक आला,देवाने तिला मोठं आणि लाल सफरचंद दिलं ती रांगेतून बाहेर पडताच तीच सफरचंद हातातून निसटून ते चिखलात पडलं.मुलगी उदास झाली._     _आता तिला दुसऱ्यांदा रांगेत राहावं लागणार दुसरी रांग पहिल्यापेक्षा लांब होती, परंतु दुसरा कोणताच मार्ग नव्हता.सर्व लोक प्रामाणिकपणे रांग लावून प्रसाद घेऊन जात होते.शेवटी ती मुलगी पुन्हा रांगेत लागली आणि तिचा क्रमांक येण्याची वाट पाहू लागली.अर्ध्या रांगेतच सफरचंद संपत आले.मुलगी उदास झाली.तिला वाटलं आपण येईपर्यंत सफरचंद संपतील परंतु तिला माहीत नव्हते की देवाचं भांडार कधी रिकामे होत नाही._     _तिचा क्रमांक आला तोपर्यंत आणखी नवे सफरचंद आले.देवाने तिच्या मनातलं ओळखलं ते तिला सफरचंद देत म्हणाले की पहिल्यादा जे सफरचंद दिलं होतं ते एका बाजूने सडलेले होत तुझ्यासाठी ते योग्य नव्हते म्हणून मीच

देव कुठे आहे?

१) देव कुठे आहे? २) देव काय पाहतो? ३) देव काय करतो? ४) देव केव्हा हसतो? ५) देव केव्हा रडतो? ६) देव काय देतो? ७) देव काय खातो? १) देव कुठे आहे? – जसे दुधात तूप कुठे आहे? तर दुधात तूप सर्वत्र आहे. तसेच देव सर्वत्र आहे. सर्व देशात, सर्व काळात व सर्व वस्तूत आहे. तो नसे ऐसा ठाव असे कवण | सर्वत्र संपूर्ण गगन जैसे ||  २) देव काय पाहतो? – जसे दिवा कुठे पाहतो? तर सर्व ठिकाणी पाहतो. तसा देव सर्वांना पाहतो. त्याचे डोळे विशाल आहेत. ‘मनोजगर्वमोचनं विशाललोल लोचनं’ |  त्याच्या दृष्टीतून काहीसुद्धा सुटू शकत नाही. ना खारुताईची सेवा ना मांडव्य ऋषींनी काजव्यास केलेली दुखापत. कोणी असं समजू नये मला कोणी पाहत नाही. तो सर्वांना आणि सर्वत्र पाहतो. ३) देव काय करतो? – भक्तांचा सांभाळ व दुष्टांचे निर्दालन. घेऊनिया चक्र गदा | हाची धंदा करितो || भक्ताराखे पायापाशी | दुर्जनासी संहारी ||  ४) देव केव्हा हसतो? – जीव जेव्हा जननीच्या उदरात असतो तेव्हा देवास सांगतो, "या संकटातून मला सोडव. मी तुझा अंश आहे." जीव म्हणतो, "सोहं, तू आणि मी समान." पण जीव जेव्हा संकटातून सुटतो, बाहेर येतो तेव्हा म्हणतो, कोहं