अक्षय तृतीया हा सण, आनंदरुपी संस्कृती ठेवाचं वरदान ।।
वाचक बंधू-भागिनींच हार्दिक स्वागत. आज आपणासाठी 'अक्षय तृतीया' या सणाचं महत्त्व सांगणारी वास्तवदर्शी कविता या ठिकाणी प्रकाशित करत आहे. आजच्या वर्तमान काळात वाचनासाठी वेळ खूप मर्यादित आहे. काही वाचक मंडळींचा प्रतिसाद आला की, सर आज लेख वाचनाची आवड प्रत्येकाला आहे,पण वाचनासाठी वेळ मिळत नाही . या मतावर कवी सुबाल म्हणजे मी देखील सहमत झालो आणि नव्या स्वरूपातला नवा उपक्रम आज वाचक मंडळीसमोर मी आणण्याचं प्रयत्न केला. मंडळी हा उपक्रम म्हणजे वास्तवदर्शी विचार कमी शब्दात काव्य स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न होय. आज आपल्या समोर आपली ग्रामीण संस्कृतीचं दर्शन घडविणारा एक सण -अक्षय तृतीया हा होय . या सणाविषयी वास्तवदर्शी विचार प्रस्तुत कवितेतून प्रकाशित. एकदा तरी कविता वाचा, आपल्या वैचारिक प्रवर्तनाचा उमटू द्या ठसा।। कवी सुबाल (वास्तवदर्शी कवी) कविता- 'अक्षय वरदान' अक्षयाचे शुभ वरदान आजच्या दिनी। अविनाशी ज्ञानाचा दाता या अक्षय जीवनी ।।१।। अरूपाचे रूप जगी, दाविती नित्य हे कर, ज्ञानाचा जाणता होऊनी, दाही दिशेचा हा वर, पावित्र