वर्ग ३ गमतीशोध प्रश्न उत्तरे
प्रश्न १. चित्र बघ ,त्यातील गमती शोध व सांग. १.वाघाला पंख आहेत. २.पक्षी मोबाईलवर बोलत आहेत. ३.उंदीर मांजराच्या मागे पळत आहे. ४.कोंबडीला शिंगे आहेत. ५.कासव झाडावर चढत आहे. ६.कोल्हा संगणक चालवत आहे. ७.मेंढीला तुरा दाखवला आहे. प्रश्न २. चित्रातील घटकांची नावे लिहा. जंगल , झाडे, पक्षी, प्राणी, संगणक प्रश्न ३. खालील नुसार योग्य निवड करा. शब्द- घुबड , कोंबडी, वाघ , कोल्हा, कासव, मेंढी, मांजर , उंदीर. पाळीव प्राणी कोणते? - मांजर पाळीव पक्षी कोणता? - कोंबडी हिंसक प्राणि कोणता? - वाघ जंगलात राहणारे प्राणी? - वाघ, कोल्हा झाडावर बसणारे कोण? - पक्षी