०९ एप्रिल @ साहित्यिक शंकरराव खरात स्मृतिदिन
******************************** *०९ एप्रिल @ साहित्यिक शंकरराव खरात स्मृतिदिन ******************************** जन्म - ११ जुलै १९२१ मृत्यू - ९ एप्रिल २००१ दलित साहित्यिक शंकरराव रामचंद्र खरात हे मराठी लेखक, कादंबरीकार व इतिहासकार होते. ते आंबेडकरी चळवळीतील एक प्रमुख लेखक होते. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून सुद्धा कार्यरत होते. खरातांचा जन्म आटपाडी येथे झाला. 'तराळ-अंतराळ' हे त्यांचे आत्मचरित्र आहे. 'मी स्वत: महात्मा फुले, शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा शिष्य आहे' असे ते नेहमी म्हणत. १९५८ ते १९६१ या काळात प्रबुद्ध भारत या नियतकालिकाचे त्यांनी संपादनही केले. १९८४ साली जळगाव येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते. 'शंकराण्णा तुम्ही असाच साहित्य लेखनात जोर केला पाहिजे. आपण पुढं एकदा माडगूळलाच साहित्य संमेलन घेऊ.' असे माडगूळकर यांनी त्यांना प्रोत्साहन दिले. त्यांच्याप्रमाणेच गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, शंकर पाटील, द.मा. मिरासदार यांच्यासोबत आचार्य प्र.के. अत्रे, शिरीष पै या