Posts

Showing posts from May, 2020

काव्य धार एक नवा प्रवाहाची .... कृषी वल्क आज काळीभोर स्व काव्य लेखन

  नमस्कार, वाचक बंधूनों आज आपल्या साठी एक नवीन विचार प्रवाहावर आधारित वास्तवदर्शी  कविता आजच्या आपल्या आवडत्या ब्लॉगवर प्रकाशित करत आहे.    आपणास लेख संदर्भात काही विचार मार्गदर्शन करावयाचे असेल तर निश्चित करू शकतात. संपर्क खाली दिलेला आहे.. काव्य धार  एक नवा प्रवाहाची .... कृषी वल्क आज काळीभोर  भु नागरताना दिसत असताना.... काळ्याशार भुईला  दिलेले वरदान, मऊदार,रवदार , भुसभुशीत करताना ... रात दिन एक करत आहे.... ‌ठाऊक आहे त्याला, रक्ताच्या घामाने पुढे येणारा, जेष्ठ आषाढ , काळ्याअन निळ्याशार ,ढगांच्या पाउल खुणा... ‌धरा मन, शीतल धारांनी तृप्त करू पाहत आहे.... ‌ 'काळ' हा त्याच्या घासावर टपून बसतांना, उरला सुरला सुगीच्या घासाचा तुकडा....  सणासुदीला  परिवारासाठी   शिल्लक ठेवला आहे. सगे सोयऱ्याच्या समवेत आनंदात  चिंब, घामानं ,प्रेमानं  नाहताना प्रेमाची साद ऐकून  नशिबीच्या विचार पावलांनी...  तो वाट तुडवत पुढे सरकत मार्गस्थआहे.. का कुणास ठाऊक सटविणे डाव हा एक आखला .. कोणतंही, कितीही रात दिन करून  कष्टणाऱ्या या कायाचा धनी  होतांना फळांचा धनी होता होऊ नये? हा डाव साऱ्यां

महानुभाव संप्रदायातील मानवी आदर्श गुरुची वास्तवदर्शी कथा ... लेखक प्रा.श्री लक्ष्मण बालू पाटील (कवी सुबाल) वास्तवदर्शी कवी.

लेखमाला १.            मानवातील मानवी भाव नित्य जागृत करणारा, एक मानुभाव आदर्श विचारठेवा चिरकाल प्रकाशमान करणारा एक अविनाशी दीपस्तंभाची  जीवन अनुभव गाथा ....            मित्रहो, आज मी  एका नव्या विषयावर विचार मांडणार आहे. आपल्या या ब्लोंगवर वास्तवदर्शी विचार काव्य स्वरुपात व समीक्षक पद्धतीने मांडण्याचा मी प्रयत्न करत असतो. आज वाचकप्रेमीसाठी नव्या विषयावर माहिती घेऊन आलो आहे.  विषय :- मानवातील मानवी भाव नित्य जागृत करणारा, एक महानुभाव आदर्श. विचारठेवा चिरकाल प्रकाशमान करणारा एक अविनाशी दीपस्तंभाची जीवन अनुभव गाथा ....                  ज्ञानाचा विचार सागर गुरु,               जीवन मार्गस्त करणारा एक वाटसरू,                तो ज्या वाटेने जातो,              त्या वाटेने साऱ्या समाजास नेऊन तो सोडतो,               प्रत्येकाच्या मनातील भाव ओळखून ,                   त्यास स्वताचे खरे गाव दाखवितो.               त्या गावातील श्रेष्ठ व्यक्ती म्हणून            आपणास जो नाव देतो.           जो आई,वडील बंधू,बहिण,            सगेसोयरे सारे प्रेमाच्या पाझराणे        जवळ करण्यास प्रवृत्त कर

सात जन्माची पुण्याई । म्हणुनी आज मिळाली आई ।।

    नमस्कार मंडळी  आपल्या आवडत्या ब्लॉकवर आपले स्वागत आहे .     मंडळी मागील काव्य लेखनास आपण वाचन प्रेमी मंडळींनी  खूप प्रतिसाद दिला.    आज आपल्यासाठी नाविन्यपूर्ण अशी वास्तवदर्शी व दिनविशेष पर आधारित काव्य रचना या ब्लॉकवर घेऊन आलो आहे. एकदा  नक्की वाचा. व प्रतिक्रिया द्या. 'सर्व  मातांसाठी शुभेच्छा संदेश' कविता - 'आई'                    (मातृ गौरव दिन) प्रेम मूर्ती ,त्यागमूर्ती कष्ट मुर्ती तू आई । सप्तनभीच्या तारकांचें तेज तू आई ।। हिम गिरीच्या शितलतेची छाया तू आई। आभाळतील काळ्या नगातील जल धारा तू आई । खड्ग सम धारदार ,कणखर  तू आई। संकटसमयी ढाल होऊनी, धैर्य दावी तू आई। माझी ममता, सदाची  समता, तू आई। अंगी नम्रता, हृदयी वात्सल्यता, वाणी मधुरता तू आई। करुणा सागर, संस्कार नागंर, तू आई। प्रेमाचा पाझर, कर्तव्याचा जागर, तू आई। झुळझुळ खळखळ  शीतल पाणी, गोड गोड अमृत वाणी, तू आई।  कर्तव्याचा व्हावे मी धनी,  नित्य असे हे तुझ्या मनी, हे स्वप्न साकार करण्यास तू आई। माझी काय, तुझी छाया, नित्य सद्गुणांचा पाया, तू आई। नित्य दिनी, माझ्या ध्यानी मनी, हृदयी वसे तू आ

मराठीतील वास्तवदर्शी लेखन प्रवाहातील अनोखी कादंबरी 'मी गोष्टीत मावत नाही' या वर कवी सुबाल यांचे वास्तवदर्शी काव्य लेखन

        नमस्कार मंडळी, आज आपल्या ब्लॉकवर नव्या वास्तवदर्शी साहित्यावर नवा साहित्य रंग वाचण्यास घेऊन आलो आहे.     खास आपल्यासारख्या वाचक प्रिय बंधू-भगिनिंसाठी.........      मंडळी काव्य लिहण्याआधी आपण , ही काव्य निर्मिती  कशी घडली, त्या विषयी माहिती वाचूया!       मंडळी आज गोष्ट आहे ,व्यक्तीची, व्यक्तीच्या वास्तवदर्शी जीवनाची. आपलं आयुष्य , जीवन जे कधीच गोष्टीत मावणारं नाही. मी बोलत आहे ,लिहीत आहे, अशाच कादंबरी विषयी...      मराठी भाषेच्या साहित्य प्रकारात कादंबरी नावाचा एक साहित्य प्रकार आहे. त्या प्रकारात लाखोंच्या वर कादंबऱ्याची निर्मिती आज मितिस झाली आहे. त्यांचे प्रकार ,विषय अनेक प्रकारचे आहेत. त्यात सामाजिक,राजकीय,ग्रामीण, हे प्रमुख प्रकार होत.       मी आज ज्या कादंबरी विषयी माहिती आपणास देणार आहे , ती कादंबरी म्हणजे  लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे लिखित 'मी गोष्टीत मावत नाही' ही होय.       ही कादंबरी म्हणजे मराठी साहित्य क्षेत्रातील आजवरच्या कादंबरी लेखनातील नवं लेखन विश्व होय. वाचक ह्या कादंबरीला एक क्षण कादंबरी म्हणू शकणार नाही. या पुस्तकाला कोणत्या प्रकारात स्थान द्

नव गावंची वास्तदर्शी किमया वास्तवदर्शी काव्य स्वरूपात

नमस्कार मंडळी,         आज सर्व वाचक मंडळींसाठी एक नव्या विषयावर वास्तवदर्शी माहिती काव्य स्वरूपात घेऊन आलो आहे .       आपण सर्व वाचक रसिक गुणीजण मंडळींनी माझ्या या छोट्याशा लेखन प्रयत्नाला  खूप प्रतिसाद दिला आहे. मी तुमचा आभारी .       आजचा लेखन विषय थोडासा वेगळ्या स्वरूपातील आहे. आपल्या या ब्लॉगवर शब्द लेखन मर्यादा मोजक्या स्वरूपातली  असली तरी मात्र ती माहिती पूर्ण आहे .    आजच्या युगात लोकांना वाचण्याची आवड आहे ; पण वेळे ची मर्यादा आहे. हा विचार ध्यानी ठेऊन आजचा वेगळा  विषय  लेखनासाठी हाती घेतला आहे.            रसिक हो आजचा विषय हा एका छोट्याशा  गावाचा आहे.तंय गावाने गेल्या चार वर्षांत उल्लेखनीय प्रगती केली आहे. ही  सर्व प्रगती  आपली स्वतःची ओळख,स्वतःचे कार्य नियोजन ह्या तत्वांचा अभ्यास केल्यामुळे सर्व शक्य झाले. चला तर वाचूया वास्तवदर्शी काव्यातून वास्तवदर्शी गावाची ओळख....   गाव- नगाव  ता.अमळनेर जि. जळगाव               नवं गावची किमया अमरनीरच्या पूर्वेला,चिखली नदी तिरी वसले नवं गाव । खडकाळ,ओसाड धरणीवर कोठेच नव्हता त्याचा ठाव ।। असमानी,सुलतानी काळाने , घातला मोठा