Posts

विश्वकल्याणार्थ वारीची

🚩⚜🚩🔆🕉🔆🚩⚜🚩            🌻 *आनंदी पहाट* 🌻           *विश्वकल्याणार्थ वारीची*                  *श्रीक्षेत्र अलंकापुरीतून*          *संत ज्ञानोबांच्या पालखी*                    *प्रस्थानाची*                  ⚜️⚜️⚜️🚩⚜️⚜️⚜️      *भक्ती चैतन्याची वारी पंढरीची*       ⚜️⚜️⚜️🚩⚜️⚜️⚜️                                                          🌹⚜️🚩🔆🙏🔆🚩⚜️🌹         *लोपलें ज्ञान जगी ।*         *हित नेणती कोणी ।*         *अवतार पांडुरंग ।*         *नाम ठेविले ज्ञानी ॥*        *या आहेत ज्ञानेश्वर माऊलींच्या आरतीतील ओळी. कधीकधी ज्ञान लोपले की आपण काय करतोय हेच समाजाला कळत नाही. मग अशावेळी ज्ञान प्रदान करुन समाजाला दिशा देण्यासाठी झालेला माऊलींचा जन्म.. त्यांनी केलेले अलौकिक समतेचे कार्य.. समाजाला दिलेले वळण.. समाजात परमेश्वराप्रती आणि एकमेकांप्रती.. प्रत्येक जीवा विषयी निर्माण केलेला पुज्य भाव बघता माऊली म्हणजे पांडुरंग अवतारच आहे असे वारकरी मानतात.*         *वारी परंपरा जी ज्ञानेश्वरांच्या आधीपासून अव्याहत सुरू आहे. संत तुकोबांच्या घरीही पूर्वापार होतीच. ज्ञानेश्वर.. नामदेव समकालीन विश्वं

कीर्तन कार्यक्रम संपन्न 18/3/2023

Image

माळीच गावात अखंड हरिनाम संकिर्तन सोहळ्यात किर्तन आनंदोत्सवात संपन्न शिंदखेडा—

Image
*माळीच गावात अखंड हरिनाम संकिर्तन सोहळ्यात किर्तन आनंदोत्सवात संपन्न*                               शिंदखेडा— दि,३१/१/२०२३ रोजी  माळीच  येथे अखंड हरिनाम संकिर्तन सोहळा धार्मिक वातावरणात किर्तन सप्ताहातील सहाव्या दिवसाची कीर्तन सेवा ह.भ.प कोमलसिंगजी महाराज धुळे ,यांनी आपल्या मधुर वाणीतुन गायन करत संसाराचे दाखले देत सर्व भक्तांना मंत्रमुग्ध करुन घेतले ,उपस्थितांमध्ये श्रीराम मंदिर शिरपूर येथील मठाधिपती महंत सतिषदास महाराज भोंगे  व वारकरी साहित्य परिषदेचे धुळे जिल्हाध्यक्ष ह.भ.प.प्रमोद भोंगे,व सहकारी, खान्देश वारकरी सेवा मंडळ धुळे विश्वस्त मंडळ व भाजपा आध्यात्मिक संघटना धुळे जिल्हाध्यक्ष अशोक आप्पा गवळी,आध्यात्मिक संघटना शिरपुर शहर अध्यक्ष संतोष माळी, कैलास पवार बाविस्कर नाना सोनवणे नाना बी ए मामा इ,खानदेश वारकरी सेवा मंडळाचे शिरपूर तालुका अध्यक्ष निंबा दादा पाटील बाळदे ,व सहकारी शिंदखेडा तालुका अध्यक्ष, विनोदजी  पवार अमळथे ,व सहकारी शिरपूर तालुक्यातून भटाणे उंटावद, बाळदे ,सावळदे, बाभुळदे , ताजपुरी ,करवंद ,गिधाडे, शिरपूर, शिंदखेडातून वरसुस ,कलमाडी, वाघोदे , अमळथे ,नरडाणे, मांड

वर्ग ३ गमतीशोध प्रश्न उत्तरे

Image
 प्रश्न १.  चित्र बघ ,त्यातील गमती शोध व सांग. १.वाघाला पंख आहेत. २.पक्षी मोबाईलवर बोलत आहेत. ३.उंदीर मांजराच्या मागे पळत आहे. ४.कोंबडीला शिंगे आहेत. ५.कासव झाडावर चढत आहे. ६.कोल्हा संगणक चालवत आहे. ७.मेंढीला तुरा दाखवला आहे. प्रश्न २. चित्रातील घटकांची नावे लिहा. जंगल , झाडे, पक्षी, प्राणी, संगणक  प्रश्न ३.  खालील   नुसार योग्य निवड करा. शब्द- घुबड , कोंबडी, वाघ , कोल्हा, कासव, मेंढी, मांजर , उंदीर. पाळीव प्राणी कोणते? - मांजर पाळीव पक्षी कोणता? - कोंबडी हिंसक प्राणि कोणता? - वाघ जंगलात राहणारे प्राणी?  -  वाघ, कोल्हा झाडावर बसणारे कोण? - पक्षी

वर्ग ३ ,४ व ५ साठी माहिती लेखन उतारे (सराव कार्य)

१. माझा वाढदिवस  माझ्या वाढदिवशी मला खूप आनंद होतो. या दिवशी आईबाबा घर सजवतात. मला नवीन कपडे आणतात. माझ्या वाढदिवसाला माझे सर्व मित्र घरी येतात. आईबाबा सगळ्यांना खाऊ वाटतात. आम्ही खूप मजा करतो, गाणी म्हणतो. गोष्टी सांगतो. दादा सगळ्यांचे फोटो काढतो. मला माझा वाढदिवस आवडतो. या दिवशी सर्वजण माझे लाड करतात. २. माझी आई माझी आई माझ्यावर खूप प्रेम करते. ती नेहमी माझी काळजी घेते. मला शाळेत जायला मदत करते. माझा अभ्यास घेते. माझी आई जेवण छान करते. तिच्या हातचे जेवण सगळ्यांना आवडते. ती खूप काम करते, घर स्वच्छ ठेवते. माझी आई गाणेपण छान म्हणते. अशी ही माझी आई किती चांगली आहे! मला ती खूप खूप आवडते. ३. माझे बाबा माझे बाबा रोज सकाळी लवकर उठतात. थोड्या वेळाने ते कामावर जातात. माझे बाबा नेहमी कामात असतात, त्यांना नीटनेटकेपणा आवडतो. ते माझा अभ्यास घेतात. आईलाही कामात मदत करतात. माझे बाबा माझ्याशी खेळतात. मला गोष्टी सांगतात. मला त्यांनी एक सायकल आणली आहे. ते माझे खूप लाड करतात. ४. माझी मातृभाषा मराठी ही माझी मातृभाषा आहे. आम्ही घरी मराठीत बोलतो. आम्ही दूरदर्शनवर मराठी कार्यक्रम बघतो. आमच्याकडे मराठी वर्तम

एकदा स्वर्गातून घोषणा

एकदा स्वर्गातून घोषणा करण्यात आली की देव सफरचंद वाटायला येत आहेत.सर्व माणसे देवाच्या प्रसादासाठी रांगेत उभी होती.एक लहान मुलगी खूप उत्सुक होती, कारण ती पहिल्यादा देवाला बघणार होती.ती देवाची कल्पना करत मनातल्या मनात खूप खूश होती.देव रांगेतल्या लोकांना सफरचंद वाटू लागले,तीचा क्रमांक आला,देवाने तिला मोठं आणि लाल सफरचंद दिलं ती रांगेतून बाहेर पडताच तीच सफरचंद हातातून निसटून ते चिखलात पडलं.मुलगी उदास झाली._     _आता तिला दुसऱ्यांदा रांगेत राहावं लागणार दुसरी रांग पहिल्यापेक्षा लांब होती, परंतु दुसरा कोणताच मार्ग नव्हता.सर्व लोक प्रामाणिकपणे रांग लावून प्रसाद घेऊन जात होते.शेवटी ती मुलगी पुन्हा रांगेत लागली आणि तिचा क्रमांक येण्याची वाट पाहू लागली.अर्ध्या रांगेतच सफरचंद संपत आले.मुलगी उदास झाली.तिला वाटलं आपण येईपर्यंत सफरचंद संपतील परंतु तिला माहीत नव्हते की देवाचं भांडार कधी रिकामे होत नाही._     _तिचा क्रमांक आला तोपर्यंत आणखी नवे सफरचंद आले.देवाने तिच्या मनातलं ओळखलं ते तिला सफरचंद देत म्हणाले की पहिल्यादा जे सफरचंद दिलं होतं ते एका बाजूने सडलेले होत तुझ्यासाठी ते योग्य नव्हते म्हणून मीच

देव कुठे आहे?

१) देव कुठे आहे? २) देव काय पाहतो? ३) देव काय करतो? ४) देव केव्हा हसतो? ५) देव केव्हा रडतो? ६) देव काय देतो? ७) देव काय खातो? १) देव कुठे आहे? – जसे दुधात तूप कुठे आहे? तर दुधात तूप सर्वत्र आहे. तसेच देव सर्वत्र आहे. सर्व देशात, सर्व काळात व सर्व वस्तूत आहे. तो नसे ऐसा ठाव असे कवण | सर्वत्र संपूर्ण गगन जैसे ||  २) देव काय पाहतो? – जसे दिवा कुठे पाहतो? तर सर्व ठिकाणी पाहतो. तसा देव सर्वांना पाहतो. त्याचे डोळे विशाल आहेत. ‘मनोजगर्वमोचनं विशाललोल लोचनं’ |  त्याच्या दृष्टीतून काहीसुद्धा सुटू शकत नाही. ना खारुताईची सेवा ना मांडव्य ऋषींनी काजव्यास केलेली दुखापत. कोणी असं समजू नये मला कोणी पाहत नाही. तो सर्वांना आणि सर्वत्र पाहतो. ३) देव काय करतो? – भक्तांचा सांभाळ व दुष्टांचे निर्दालन. घेऊनिया चक्र गदा | हाची धंदा करितो || भक्ताराखे पायापाशी | दुर्जनासी संहारी ||  ४) देव केव्हा हसतो? – जीव जेव्हा जननीच्या उदरात असतो तेव्हा देवास सांगतो, "या संकटातून मला सोडव. मी तुझा अंश आहे." जीव म्हणतो, "सोहं, तू आणि मी समान." पण जीव जेव्हा संकटातून सुटतो, बाहेर येतो तेव्हा म्हणतो, कोहं